औरंगाबाद : शहरातील कमलनयन बजाज रूग्णालयाच्या नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. साहिल लव्हारे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या जवळील चिट्ठीत महाविद्यालयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
या प्रकारानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या बाहेर येत ठिय्या मांडला आहे. या विद्यार्थ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी प्राचार्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येत आहेत.
महाविद्यालयाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्यासाहिल लव्हारे यास महाविद्यालय प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याला ऑनलाईन लेक्चरला सामील करून ने घेणे, शिष्यवृत्तीच्या रक्कमेवरुन त्रास देणे, उपस्थित असून अनुपस्थिती लावणे, पोस्टिंग ने देणे असे प्रकार सातत्याने केल्याने त्याने निराश होऊन टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.