लाडसावंगी : स्वस्त धान्य दुकानात मोफत आलेल्या धान्याचे दुकानदाराने लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन धान्य वाटल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला. प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचल्याने चौकशीला आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कार्यवाहीसाठी घेराव घातल्याने काही काळ लाडसावंगीत तणाव निर्माण झाला होता. शासनाकडून मोफत धान्य आले असून संबंधित रेशन दुकानदारांनी नागरिकांकडून पैसे वसूल केल्याचा प्रकार पुढे आला होता.
कोरोना महामारीत हाताला काम नसल्याने गरीब नागरिकांचे हाल होत असल्याने शासनाने त्यांना माेफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. शिधापत्रिकेतील लाभार्थींना प्रती व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत वाटपाचे आदेश होते. त्याअनुषंगाने पुरवठा सुद्धा करण्यात आला होता. परंतु १२ ते १४ मे दरम्यान लाडसावंगीतील पाच स्वस्त धान्य दुकानात पैसे घेऊन धान्य वाटप झाल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य अर्जुन शेळके यांच्याकडे ग्रामस्थांनी केले होती. सय्यदपूर, पिंपळखुंटा गावात दोन वेळा मोफत योजनेचे धान्य वाटप झाले. मग लाडसावंगीत पैसे का घेतात याची चौकशी पुरवठा विभागात केल्यानंतर दुकानदारांचे बिंग फुटले.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता नायब तहसीलदार शैलेश राजमाने, मंडळ अधिकार केदारे, तलाठी राज आठवले आदींनी लाडसावंगी ग्रामपंचायतीमध्ये येऊन चौकशी केली. यादरम्यान ग्रामस्थांनी संबंधित दुकानदारावर कार्यवाही झालीच पाहिजे म्हणून काही वेळ गोंधळ घालत चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेरले होते. यानंतर चौकशी पथकाने गावातील पाचही दुकानात जाऊन स्वस्त धान्य दुकानात किती गहू, तांदूळ शिल्लक असून किती वाटप केला याची चौकशी केली. प्रत्येक दुकानात अधिकारी भेट देता असतांना ग्रामस्थ त्यांच्यासोबत फिरत होते. एकीकडे कोरोना महामारीत अनेक जण गरजूंना मदत करताना दिसून येत आहेत. पण काही जण ही संधी म्हणून नागरिकांची लूट करीत असल्याचे सुद्धा चित्र आहे.
--------- थम यासाठीच नको आहे का ? ----------
एकीकडे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती दाखवत शिधापत्रिकाधारकांना थम ना? घेता धान्य वाटपाची मागणी स्वस्त धान्य दुकानदार करीत आहेत. दुसरीकडे मोफत आलेल्या धान्याचे पैसे वसूल केले जात असल्याचे चित्र आहे. धान्य वाटपाचा काळाबाजार करता यावा म्हणून तर थम बंद करण्याचा घाट दुकानदारांकडून सुरू नाही ना? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लाडसांवगीतील या पाच दुकानातील एक रेशन दुकान उपसरपंचाचे आहे. त्यामुळे त्यांच्यासह संबंधित दुकानांवर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
------- अहवाल वरिष्ठांकडे देणार ---------
लाडसावंगीत दुकानदारांनी पैसे घेऊन धान्य वाटप केल्याच्या तक्रारीवरून प्रत्येक दुकानाचा पंचनामा करण्यात आला असून संबंधित सर्व अहवाल वरिष्ठांकडे तातडीने देणार आहे.
-- शैलेश देशमाने, नायब तहसीलदार, औरंगाबाद
------- परवाना रद्द करा --------
शासनाने मोफत धान्य वाटपाच्या आदेशाला लाडसावंगीतील पाचही दुकानदारांनी हरताळ फासला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या पाचही दुकानांचा परवाना रद्द झाला पाहिजे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.
- अर्जुन शेळके, पंचायत समिती सदस्य, लाडसावंगी गण
------ कॅप्शन : लाडसावंगीतील रेशन दुकानात चौकशी करताना महसूल विभागाचे पथक.
150521\img_20210515_124015.jpg
------ कॅप्शन : लाडसावंगीतील रेशन दुकानात चौकशी करताना महसूल विभागाचे पथक.