जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेडच्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर शेतकरी व हमाल यांच्या गुरूवारी दुपारी धक्काबुक्की झाल्याने संतप्त हमालांनी काटे बंद पाडले होते. शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात तूर खरेदी करण्यात आली. दरम्यान दिवसभरात सुमारे एक हजार क्विंटल तूर खेरदी करण्यात आली असल्याचे नाफेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जालना बाजार समितीत नाफेडच्या वतीने हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. आहे. शासनाकडून तूरीला ५ हजार ५० रूपये क्विंटल भाव देण्यात येत असल्याने जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी या खेरदीकेंद्रावर गर्दी केलेली आहे. जालना जिल्ह्यासह नजीकच्या बुलढाणा, औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही या ठिकाणी तूर विक्रीसाठी आणली आहे.शेतकऱ्यांची गर्दी पाहता नाफेड करून तूर खरेदी करण्यासाठी पाच काट्यांची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक काट्यावर दहा हमाल आहेत. गुरूवारी वाद झाल्याने काट्यावरील खरेदी बंद करण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी आणखीनच संतप्त झाले होते. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नाफेडच्यावतीने शुक्रवारी पोलीस बंदोबस्त माागविण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात ही खरेदी सुरू झाली. दिवसभरात सुमारे एक हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याचे नाफेडचे मार्केटिंग आॅफीसर शिवानंद पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बंदोबस्तात तूर खरेदी
By admin | Published: February 25, 2017 12:41 AM