शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

समांतरवर ‘दुकानदारी’

By admin | Published: July 24, 2016 12:26 AM

मुजीब देवणीकर, औरंगाबाद शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठ्याचा कारभार ३ आॅगस्टनंतर महापालिका स्वत: पाहणार आहे. मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागातील

मुजीब देवणीकर, औरंगाबादशहराच्या संपूर्ण पाणीपुरवठ्याचा कारभार ३ आॅगस्टनंतर महापालिका स्वत: पाहणार आहे. मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा विभागातील ३८४ कर्मचारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला दिले होते. याच कर्मचाऱ्यांच्या साह्याने पूर्वीप्रमाणे काम पाहण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत कंपनीतील तब्बल ८२० कर्मचारी महापालिकेत कंत्राटी स्वरुपात घेण्याचा अजब डाव प्रशासनातर्फे आखण्यात आला आहे. येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मनपाला दरवर्षी सुमारे ४ कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मागील २१ महिन्यांमध्ये शहरात एकही नवीन जलकुंभ बांधला नाही. अतिरिक्त पाण्याच्या लाईनही टाकल्या नाहीत. मुख्य जलवाहिनीचे कामही अर्धवट आहे. जायकवाडीपासून औरंगाबादपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मनपा भविष्यात स्वतंत्र कंत्राटदार नेमणार आहे. शहरात पाणी आणल्यानंतर जलकुंभ बांधणे, जलवाहिन्यांचे जाळे पसरविणे आदी कामे हळूहळू (पान ५ वर)औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीचे कर्मचारी मनपात कंत्राटी स्वरुपात घेण्यासंदर्भात अजून प्रशासकीय प्रस्ताव अधिकृतपणे माझ्याकडे आलेला नाही. असा प्रस्ताव येणार आहे. हे कर्मचारी मनपात घेतले तर त्यावर येणारा खर्च किती हेसुद्धा तपासून घ्यावे लागेल. कंपनीचे काम चांगले होते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न असेल तर ते चुकीचे आहे. प्रशासन नेमके कोणत्या दिशेने जात आहे, हेसुद्धा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसाधारण सभा शहराच्या हितासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. प्रस्ताव आल्यावर निश्चित चाचपणी होईल.त्र्यंबक तुपे, महापौरशहराचा पाणीपुरवठा मनपा सांभाळत असताना २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५८ कोटी रुपये खर्च आला होता. १ सप्टेंबर २०१५ मध्ये कंपनीकडे पाणीपुरवठा वर्ग केला. अवघ्या सात महिन्यांमध्ये कंपनीने खर्च ७६ कोटींपर्यंत नेला. सुरुवातीला कंपनीने विभागनिहाय ३१८ कर्मचारी नेमण्याचे निश्चित केले होते. आता ८०० कर्मचारी आले कोठून, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मनपाचे कर्मचारी भविष्यात पाणीपुरवठा सांभाळण्यास सक्षम आहेत. मागील २१ महिन्यांमध्ये कंपनीने कोट्यवधी रुपयांची अक्षरश: उधळपट्टी केली. या खर्चाची चौकशी करा, अशी मागणी करण्यासाठी आम्ही शुक्रवारी आयुक्तांना भेटण्यास गेलो. आयुक्तांनी भेट न दिल्याने आम्ही निघून आलो. जनतेच्या पैशांची अशा पद्धतीने कोणी उधळपट्टी करणार असतील तर आम्ही परत शासनाकडे याची चौकशी करा, अशी मागणी करणार आहोत.प्रा. विजय दिवाण, सदस्य, समांतर पाणीपुरवठा खाजगीकरणविरोधी नागरी कृती समितीकंपनीच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना दरमहा प्रत्येकी ३० ते ५० हजार रुपये पगार द्यायचा झाल्यास सुमारे ४ कोटी रुपये खर्च येणार आहेत. हे कर्मचारी घेतल्यास पाणीपुरवठ्याचा दरमहा खर्च सुमारे १२ कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.