शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बसस्थानकात हॉकर्सची ‘दुकानदारी’

By admin | Published: July 01, 2016 12:24 AM

विजय सरवदे, संतोष हिरेमठ , औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक सुरक्षित नाही. फेरीवाल्यांच्या नावाखाली तेथे कोणीही यावे अन् व्यवसाय करून जावे, असे चित्र दिसले. हॉकर्सचा परवाना एकाचा अन् प्रत्यक्षात मात्र,

विजय सरवदे, संतोष हिरेमठ , औरंगाबादमध्यवर्ती बसस्थानक सुरक्षित नाही. फेरीवाल्यांच्या नावाखाली तेथे कोणीही यावे अन् व्यवसाय करून जावे, असे चित्र दिसले. हॉकर्सचा परवाना एकाचा अन् प्रत्यक्षात मात्र, व्यवसाय करतो दुसराच. तेथे कोणी हॉकर्सला हटकतही नाही. हटकलेच तर राज्य परिवहन मंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्याला घेरून मारण्याचा प्रयत्न होतो. परवा रविवारी तसेच झाले. तेथे पोलीस चौकी आहे; पण सुरक्षेची हमी नाही. नियम धाब्यावर बसवत सर्रासपणे मध्यवर्ती बसस्थानकात फेरीवाल्याचा व्यवसाय सुरू असल्याचा प्रत्यय गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधींना आला. मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी एका बसमध्ये पाण्याच्या बॉटल्स् विक्री करणाऱ्या हॉकर्सला कंडक्टरने हटकले. त्याचा राग अनावर झालेल्या हॉकर्सने सर्वांसमक्ष कंडक्टरची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने गुरुवारी बसस्थानकातील हॉकर्सचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. तेव्हा अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून दरवर्षी हॉकर्ससाठी परवाने दिले जातात. मध्यवर्ती बसस्थानकासाठी सद्य:स्थितीत ३० हॉकर्स आणि कॅन्टीन तसेच स्टॉलचे ६ (आस्थापना) परवानाधारक व्यवसाय करतात. कॅन्टीन तसेच अन्य स्टॉल्सचे प्रत्येकी तिघेजण बसस्थानकात फिरून पाण्याच्या बाटल्या किंवा अन्य खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात. नियमानुसार या आस्थापनांना तीन हॉकर्सची परवानगी आहे; पण प्रत्यक्षात बसस्थानकात तीनपेक्षा अधिक हॉकर्स व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. याशिवाय, काहीजणांच्या परवान्यांवर (पोट भाडेकरू) दुसरेच फेरीवाल्याचा धंदा करत असल्याचे चित्र दिसून आले. बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या फलाटावरही काही फेरीवाल्यांचे स्टॉल्स आहेत. त्यापैकी अनेकजण हे ‘पोट भाडेकरू’ असल्याचे दिसून आले. त्यांचे परवाने तपासले तेव्हा त्यावर दुसऱ्याचेच नाव आणि फोटो होते. मूळ परवानाधारक कुठे आहे, अशी विचारणा केली तेव्हा, ‘ते जेवण करण्यासाठी घरी गेले आहेत’ असे सगळ्यांचे सारखेच उत्तर ऐकायला मिळाले.मध्यवर्ती बसस्थानकातून बॅग चोरीला गेली. बसमध्ये पॉकीट मारले, अशा घटना नित्याच्याच झाल्यात. तेथे स्वतंत्र पोलीस चौकी आहे; पण पोलिसांचा गुन्हेगारांवर जरब नाही. एखाद्यावेळी तक्रार घेऊन गेले तर पोलिसांनी ती कधीही गांभीर्याने घेतलेली नाही. यासंदर्भात आगार व्यवस्थापक सी. के. सोळसे म्हणाले की, बसस्थानकाला पोलीस चौकीची गरजच नाही. ‘असून वळिंबा अन् नसून खोळंबा’ अशी या पोलीस चौकीची गत झालेली आहे. आम्ही पोलीस उपायुक्तांनाही सांगितले की, या पोलीस चौकीचा आम्हाला काहीच उपयोग नाही. ती नसलेली बरी. स्थानक परिसरात परवानाधारक फेरीवाला खाद्यपदार्थांची विक्री करू शकतात, पण फलाटात उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन ते विक्री करू शकत नाहीत. परवाना देताना त्यावर खाद्यपदार्थांची नावे नमूद असतात. मात्र, त्याव्यतिरिक्तही खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जाते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ‘लोकमत’चा चमू जेव्हा बसस्थानकात पोहोचला तेव्हा थंड पाण्याच्या बाटल्यांची विक्री करणारे हॉकर्स फलाटात उभ्या असलेल्या सर्वच बसमध्ये होते. सदरील प्रतिनिधींनी फलाटावरील हॉकर्सकडे परवाने तपासण्याची मोहीम सुरू केली तेव्हा स्थानकातील बहुतांशी ‘बोगस’ फेरीवाले गायब झाले. विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बसस्थानकात परवानाधारक फेरीवालाच व्यवसाय करू शकतो. दुसऱ्याच्या परवान्यावर कोणी व्यवसाय करत असेल, तर संबंधिताचा परवाना रद्द केला जाईल. यासंदर्भात लवकरच तपासणी केली जाईल. बसमध्ये जाऊन कोणालाही खाद्यपदार्थ किंवा अन्य कसलीही विक्री करता येत नाही. \राज्य परिवहन महामंडळात कार्यरत अधिकाऱ्यांचे जवळचे मित्र तसेच नातेवाईकांच्या नावे हॉकर्सचे परवाने आहेत. ४त्यांनी हे परवाने दुसऱ्यांना प्रतिदिन २०० ते ४०० रुपये या दराने भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यामुळे परवानेधारक अधिकाऱ्यांची आणि बोगस फेरीवाल्यांची ‘मिली जुली’ आहे, अशा अधिकाऱ्यांची नावेही ‘लोकमत’कडे आहेत.