धनगरपाडा परिसरात डीपी असलेल्या परिसरात रहदारीचा रस्ता असून बाजूला लोकवस्ती आहे. डीपी परिसरात शेतकऱ्यांनी चूल पेटविण्यासाठी आपल्या शेतातून कपाशीचे फास आणून डीपीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर साठविले होते. डीपीवर शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने येथे मोठी आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी डॉ. महाजन यांच्या दवाखान्यात असलेले फायर पंप घेऊन कर्मचारी अक्षय साळुंके यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पाण्याचे ट्रॅक्टरही आल्याने शेजारी असलेले डॉ. विजय महाजन, अक्षय साळुंके, संतोष जाधव, राजेंद्र सुरासे, बाबूराव आगवान, धन्नालाल चुडीवाल, महावितरणचे लाईनमन सचिन तारडे व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. यामुळे इतर हानी टळली.
शिऊर परिसरात उघड्यावर असलेल्या डीपींना कंपाऊंड करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
फोटो : धनगरपाडा परिसरात लागलेली आग.
090521\sunil trimbakrao shirode_img-20210509-wa0021_1.jpg
धनगरपाडा परिसरात लागलेली आग.