लेणी बंद असल्याने ५० च्या आसपास हॉटेल, लॉज तसेच तीनशेच्या आसपास हॉकर्स, विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांनी रोजंदारीवर शेतीमध्ये काम केले. आता लेण्या सुरु झाल्याने त्यांचे अर्थचक्र रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वेरूळ लेणी पाहण्यासाठी सकाळी हजार व दुपारी हजार अशा दोन हजार ऑनलाईन नोंदणी केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांचे जायंटस ग्रुप ऑफ खुलताबादच्या वतीने राजेंद्र चव्हाण, दिनेश सावजी, अध्यक्ष जफरखान पठाण आदींनी स्वागत केले.
चौकट
ऑनलाईन नोंदणीमध्ये व्यत्यय
वेरूळ लेणी पाहण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर व्यत्यय येत होता. कोड स्कॅन होत नसल्याने पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. दिवसभरात लेणी परिसरात चालणाऱ्या बसमध्ये २६ पर्यटकांनी प्रवास केला. फोटो कॅप्शन : वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटक व पर्यटकांचे स्वागत करतांनी जायटंस ग्रुपचे पदाधिकारी.
फोटो आहे.