शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आमचे तरुणपण भरतीच्या तयारीतच घालवायचे का ? पोलीस भरतीला स्थगितीने संताप

By राम शिनगारे | Published: November 03, 2022 11:57 AM

सतत लांबणाऱ्या भरतीविषयी तरुणांमध्ये संतापाचे वातावरण

- राम शिनगारेऔरंगाबाद : मागील काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरतीला मिळालेल्या स्थगितीमुळे संतापाचे वातावरण आहे. राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यातील किती जागा भरणार याविषयीची माहिती जाहीर केली. तसेच प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षक, आयुक्तांनी पोलीस भरती करण्याविषयीची जाहिरात १ नोव्हेंबर रोजी द्यावी, असे आदेशही प्रशिक्षण व खास पथके विभागाचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी दिले होते. या आदेशाला २४ तास उलटण्यापूर्वीच स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तयारी करणाऱ्या युवकांमध्ये संतापासह संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस भरती पुढे ढकललीमागील काही वर्षांपासून सतत पोलीस भरती होणार असल्याची घोषणा राज्यकर्ते करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या लाटेनंतर २०२१ मध्ये रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात भरती झालीच नाही. त्याच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय विद्यमान राज्य शासनाने घेतला. त्याची घोषणा झाल्यानंतर १२ तासांच्या आत तांत्रिक कारणास्तव भरती पुढे ढकलल्याचे जाहीर केले.

जिल्ह्यात १९३ पदांसाठी होणार भरतीजाहीर केलेल्या जागांमध्ये शहर आयुक्तालयात एकही जागांची भरती दाखविण्यात आलेली नव्हती; तर ग्रामीण पोलीस विभागात ३९ आणि औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ अशा एकूण १९३ जागांसाठी भरती होणार आहे.

तरुणांच्या भावनांशी खेळपाच वर्षांपासून औरंगाबादेत भाड्याच्या खोलीत राहून भरतीची तयारी करीत आहे. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना आई-वडील मोलमजुरी करून पैसे पुरवतात. शासन केवळ भरतीची घोषणा करून आमच्या भावनेशी खेळते आहे.- नंदकिशोर सवडे, भरतीची तयारी करणारा तरुण

तयारीत डोक्यावरील केस गेलेगेल्या ४ वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत आहे. आई-वडील ऊसतोड करतात. आजपर्यंत शासनाने केवळ घोषणाच केल्या. भरती मात्र झालीच नाही. एवढ्या तयारीत डोक्याला केस राहिले नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही जगणार तरी कसे?- कृष्णा जराड, भरतीची तयारी करणारा तरुण

वेळेवर भरती का होत नाहीमाझी मुलगी गेल्या पाच वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. मी ऊस तोडणी करून मुलीला शिकवते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना शासन वेळेवर पोलीस भरती का घेत नाही. त्याचा मानसिक त्रास आम्हाला होतो.- ज्योती सिरसाट, पालक

मुलांना मोलमजुरी करून शिकवितोमाझा मुलगा, मुलगी मागील चार वर्षांपासून भरतीची तयारी करीत आहे. आम्ही अल्पभूधारक शेतकरी असून, शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मुलांना मोलमजुरी करून शिकवितो. मुलंही दिवस-रात्र तयारी करीत आहेत, पण भरती वेळेवर होत नाही.- गणेश मुळे, पालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार