शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

श्री कालिंका देवी यात्रोत्सव

By admin | Published: March 25, 2017 11:15 PM

तळणी : मंठा तालुक्यातील हेलस येथील प्राचीन श्री. कालिंका देवी मंदिर संस्थानतर्फे ३० मार्चपासून श्री. कालिंका देवीच्या ३४ व्या वार्षिक यात्रौत्सवास सुरूवात होत आहे

तळणी : मंठा तालुक्यातील हेलस येथील प्राचीन श्री. कालिंका देवी मंदिर संस्थानतर्फे ३० मार्चपासून श्री. कालिंका देवीच्या ३४ व्या वार्षिक यात्रौत्सवास सुरूवात होत आहे. यानिमित्त कीर्तन, भजन, प्रवचन आदी विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपर्यंत उत्सव चालणार आहे. उत्सवानिमित्त दररोज सकाळी साडे सात ते साडे नऊ या कालावधीत रेखाबाई बारसकर व आबासाहेब शिलवंत यांच्या पौराहित्यात श्री कालिंका देवीस चढाव, अभिषेक, महापूजा, आरती व सायंकांळी सात वाजता आरती व छबिना आदी कार्यक्रम होतील. गुरूवारी रात्री नऊ वाजता समाजभूषण माणिक महाराज मांगुळकर (दहेगाव ता.जिंतूर ) यांचे कीर्तन होणर आहे. शुक्र वारी वारकरी शिक्षण संस्थेचे रामेश्वर महाराज यांचे कीर्तन तर शनिवारी सकाळी अकरा वाजता देविदास महाराज ढोके यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन सेवा होणार आहे. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळ, नवयुवक मंडळ व भक्तगण पुढाकार घेत आहेत. उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर, उपाध्यक्ष सुभाष दहीभाते, बालासाहेब दहीभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर यांच्यासह संस्थानच्या सदस्यांनी केले आहे. (वार्ताहर)