छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील मंदिरात श्रीरामाचे बालरूपात आगमन होत आहे. यामुळे देशभराप्रमाणेच शहरातील रामभक्तांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत सोमवारी प्राणप्रतिष्ठा महोत्सव असून हा उत्सव अविस्मरणीय करण्यासाठी शहरांतही विविध मंदिरांत, कॉलन्यांत, चौका- चौकांत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची पूजा, आरती, भजन, सुंदरकांड वाचन, दीपोत्सव, आतषबाजी करून दिवाळी साजरा करण्यात येणार आहे.
समर्थ राम मंदिरसमर्थनगरातील वरद गणेश मंदिर व श्री समर्थ राम मंदिराच्या वतीने सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेदरम्यान अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण. रामरक्षा व मारुती स्तोत्र पठण, सायंकाळी ६:१५ वाजता दीपोत्सव, महाआरती, आतषबाजी.
खडकेश्वर मंदिर मैदानमाहेश्वरी समाजाच्या वतीने खडकेश्वर मंदिराच्या मैदानावर सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता ११११ दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पुंडलिकनगरपुंडलिकनगरात सायंकाळी ६ वाजता श्रीरामाची महाआरती व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
गुलमंडीशिवसेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने गुलमंडी चौकात सकाळी ११:३० वाजता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची महाआरती करण्यात येणार आहे. गुलमंडीवरील व्यापाऱ्यांच्या वतीने सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.
राजाबाजारात महाआरतीराजाबाजार येथील बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिरात दुपारी १२ वाजता, सुंदरकांड दुपारी १ ते ४ वाजता, भजनसंध्या सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान. मंगळवारी (दि. २३) मदनमोहन महाराज यांचे रामचरित मानसवरील प्रवचन. सायंकाळी ५ ते ७ वाजता.
टिळकनगरटिळकनगरातील पावन मारुती मंदिरात सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा, भक्तिगीतांचा कार्यक्रम, सकाळी ११ ते दुपारी २ अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण. आरती व सायंकाळी गीतरामायण.
तापडियानगरतापडियानगर येथील श्रीदत्त मंदिरात सायंकाळी आरती, दीपोत्सव व आतषबाजी.
सिडको एन वनसिडको एन वन येथील भक्तीनगरात नर्मदेश्वर महादेव मंदिरात सायंकाळी ७ वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम, ११०० दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे.
क्रांती चौकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्रांती चौक येथे सकाळी १०:३० वाजता भगवान श्रीरामचंद्रपूजन, धार्मिक पुस्तकांचे व महाप्रसाद वाटप.
चिकलठाणाचिकलठाणा येथील श्रीराम मंदिर, अयोध्यानगरी येथून सकाळी ८:३० वाजता कलश यात्रेला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण, महाआरती, सायंकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान दीपोत्सव, चिकलठाणा चौकात आतषबाजी.
श्रीरामनगरचेतक घोडा चौकातील श्रीरामनगरात श्रीराम मंदिरात सकाळी ७ ते ९ वा. श्रीराम पादुका प्रतिष्ठा व पूजन, होमहवन, कलश पूजन, श्रीराम अभिषेक, श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण, अयोध्येतील थेट प्रक्षेपण, श्रीरामाची आरती.दीपोत्सव, श्रीराम आरती व आतषबाजी, वेळ सायंकाळी ६ ते ७ वा.
पारदेश्वर मंदिरपळशी रोडवरील पारदेश्वर मंदिरात रामनाप जप, रामरक्षा स्तोत्र पठण, हनुमान चालिसा पाठ सकाळी १० वाजेपासून. शोभायात्रा, वेळ दुपारी ४ वा.
बाळकृष्ण महाराज समाधी मंदिरऔरंगपुरा येथील बाळकृष्ण महाराज समाधी मंदिरात दुपारी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण. सायंकाळी ६ वाजता आरती व प्रसाद वाटप.
दिशानगरीबीड बायपास येथील दिशानगरी गणपती मंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ८:३० वाजेदरम्यान प्रभू श्रीराम प्रतिमा पूजन, नित्य उपासना, दीपोत्सव, वेद मंत्रांचे पठण, महाआरती व महाप्रसादाचे वाटप, असा कार्यक्रम होणार आहे.
सुपारी हनुमान मंदिरअखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ११ पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक, सकाळी ११ वाजता महाआरती, त्यानंतर दिवसभर प्रसादाचे वाटप.
इस्कॉन मंदिरवरुड फाटा येथील इस्कॉन मंदिर (व्ही.ई.सी.सी.) येथे सायंकाळी ६ वाजता भव्य श्रीराम दरबार दर्शन, कीर्तन, रामकथा, दीपोत्सव व महाप्रसादाचे वाटप, असे कार्यक्रम होणार आहेत.
सिडको एन ६येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्यावतीने श्रीराम बँड रथ काढण्यात येणार आहे. तसेच येथे ११ हजार बुंदीचा लाडू वापरून रांगोळी काढण्यात आली आहे. या लाडूंचे भाविकांना वाटप करण्यात येणार आहे.
भाजपतर्फे दीपोत्सवभाजपाच्यावतीने क्रांतीचौकात सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
नासगल्लीकासारी बाजारातील नासगल्ली येथे ऋणमोचक गणेश मंडळाच्यावतीने संगीतमय सुंदरकांड. सायंकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.
अहिंसानगरअहिंसानगरातील शिवगणेश मंदिरात दुपारी १२ ते १, भजन, शंखनाद, सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत भजन दिंडी, श्रीरामाची पालखी, दीपोत्सव, आरती व महाप्रसाद वाटप होईल.
श्रीभक्तीनगरसिडकोतील श्री भक्तीनगरात जागृत हनुमान मंदिरात सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे प्रक्षेपण, दुपारी १ ते २ कळसारोहण, सायंकाळी भंडारा होईल.
भांडीबाजारहिंदू धर्मरक्षक मित्र मंडळाच्यावतीने प्रभू श्रीरामाच्या नवीन उत्सव मूर्तीची राजाबाजार येथून सकाळी ८ वाजता शोभायात्रा, भांडीबाजार चौकात दुपारी ११ ते १२:३० अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे थेट प्रक्षेपण, उत्सव मूर्तीची महाआरती, प्रसाद वाटप. सायंकाळी ११०० दिव्यांचा दीपोत्सव व आतषबाजी होईल.
ज्योतीनगरयेथील विठ्ठल मंदिरात सकाळी ९ वाजता दिंडी, दुपारी थेट प्रक्षेपण, श्रीराम नामजप, दुपारी २ वाजता महाप्रसाद, ४ वाजता भजन, श्रीरामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा, भीमरुपी स्तोत्र, नित्य हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता सामूहिक आरती करण्यात येईल.
सातारासातारातील हिमालयेश्वर मंदिरात श्रीराम दरबार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, शांतीसूक्त स्थापित देवता पूजन, उत्तरांग हवन मूर्ती प्राणप्रतिष्ठा, आरती व हभप सतीश जाधव महाराजांचे काल्याचे कीर्तन महाप्रसाद वाटप. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होईल.