- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : महापालिकेच्या ( Aurangabad Municipal Corporation ) केंद्रावर कोरोना टेस्ट (Corona Virus) केली आणि अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास रुग्णालयात भरती व्हावे लागेल, या भीतीने घरच्या घरी टेस्ट करून घेण्याकडे सध्या नागरिकांचा कल आहे. कारण घरी टेस्ट केल्यानंतर कुणालाही कळणार नाही. नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक आणि आधार कार्ड न देता शहरातील औषधी दुकानांवर सेल्फ टेस्टिंग किट अगदी सहजपणे मिळत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.
अशा बाधित नागरिकांना कोरोना झाला असेल तरी त्याची प्रशासनाकडे नोंद होतच नाही. ही बाब गंभीर ठरू शकते. हे नागरिक घरीच राहून उपचार घेतात. बाधितांचा खरा आकडा समजत नाही.
आधार कार्डसह नोंदणी गरजेचीसेल्फ टेस्ट किट घेण्यापूर्वी ग्राहकाला आधार कार्ड दाखविणे गरजेचे आहे. आधार कार्डवरील माहिती नोंदवून मगच किट मिळावी. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. २५० रुपये मोजले की किट हातात येते. आकाशवाणी चौकातील औषधी दुकानात मोबाइल नंबरशिवाय ही किट देण्यात आली नाही.
समर्थनगर येथील औषधी दुकानावरील संवादप्रतिनिधी - कोविड टेस्ट किट पाहिजे.
कर्मचारी- २५० रुपये लागतील.प्रतिनिधी - यापेक्षा कमी किमतीचे नाही का?
कर्मचारी - नाही.पैसे देऊन प्रतिनिधीने किट खरेदी केली. प्रतिनिधीला साधे नावही विचारण्यात आले नाही.
---................जवाहर काॅलनी परिसरातील औषधी दुकानावरील संवाद
प्रतिनिधी- कोरोना चाचणीसाठी किट पाहिजे.कर्मचारी- किती पाहिजे?
प्रतिनिधी- एकच पाहिजे.कर्मचारी - नाव लिहून जा, संध्याकाळी मिळेल.
प्रतिनिधी - लगेच मिळेल का?कर्मचारी - नाही.....................आरोग्य अधिकारी समोर, आधार कार्डची मागणीसमर्थनगर येथील एका अन्य दुकानावर आरोग्य अधिकारीच औषधी खरेदी करण्यासाठी आले होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने औषधी दुकानातील कर्मचाऱ्यास किटची विचारणा केली. तेव्हा ते सहज मिळाले. हे पाहून आरोग्य अधिकारी चकित झाले. त्यांनी विचारणा केली, तेव्हा आधार कार्ड असल्याशिवाय किट दिली जात नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.
औषधी दुकानदारांना सूचनासेल्फ टेस्टिंग किटसंदर्भात दुकानदारांना सूचना करण्यात आली आहे. किट घेणाऱ्यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे. कोणी दुर्लक्ष करीत असेल तर औषधी प्रशासनाला कळवा.- संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)