फुलंब्री : तालुक्यातील गेवराई पायगा येथील दोन शेतकरी भावंडानी नवीन प्रयोग करून तीन एकर क्षेत्रात रोपवाटिका उभारली. एका वर्षात एक कोटी रोपे त्यांनी विकली. यातून ते महिन्याकाठी दोन लाख रुपये कमावत आहेत. सोबतच ३० जणांना रोजगार ही या भावडांनी उपलब्ध करून दिला आहे.
गेवराई पायगा येथील शेतकरी गजानन साबळे व श्रीराम साबळे ह्या दोन भावंडाकडे एकूण आठ एकर शेती आहे. त्यांनी पाच एकर जमिनीवरील दहा गुंठे क्षेत्रात २०१४ मध्ये मिरची, टमाटे, वांगे, कोबी, टरबूज, खरबूज पपई, शेवगा, झेंडू फुले, कारले, दोडके याची रोपवाटिका सुरु केली. २०१९ मध्ये कृषी विभागाकडून शेडनेट मिळाले. यामुळे रोपवाटिकेचा विस्तार झाला. आता प्रत्येक वर्षी एक कोटी रोपे तयार करून ते विक्री करीत आहेत. यातून महिन्याकाठी दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे शेतकरी भावडांनी सांगितले.
३० जणांना रोजगार दिलाया रोपवाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जातीचे रोप टॅग केले जाते़. रोपे तयार केल्यानंतर वहित जात, तारीख, खते, पाणी यांची नोंद केली जाते़. कोणते रोप किती प्रमाणावर उगवले याची नोंद ते ठेवतात. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही़. शेतक-यांनी कोणते पीक घेतले म्हणजे फायदेशीर ठरेल याचा अभ्यास करून ते शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन ही करतात. याशिवाय रोपवाटिकामध्ये भाजीपालासह, फळ, फुलांची रोपे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यातून त्यांच्या कुटुबियांबरोबर आणखी ३० जणांना रोजगार मिळाला आहे.
हायटेक पद्धतीने रोपनिर्मिती सुमारे तीन एकरांवर सध्या त्यांच्याकडे रोपवाटिका आहे त्यांच्याकडे रोपांची निर्मिती पूर्णपणे ट्रेमध्ये केली जाते.ट्रे भरण्यासाठी कोकोपीट चा वापर केला जातो ,ट्रेमध्ये बी भरण्यासाठी खास सीडलिंग मशिन आहे.या मशिनद्वारे बियाणे ट्रेम मध्ये भरली जाते मशीन मुळे बियाणे सारख्या खोल अनंतराव टोकन होते त्यामुळे सर्व रोपे ही एकसमान तयार होतात. ट्रे खाली विशिष्ठ अशी मॅट असल्याने रोपांचे बुरशीजन्य रोगांसह अन्य कीड- रोगांपासूनही संरक्षण होते. या रोपवाटिका मधून मिळणारे विविध भाजीपाल्याचे रोपे जालना, औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी शेतात येऊन खरेदी करीत आहेत दररोज शेड नेट ठिकाणी शेतकऱ्यांना आपली वाहाने घेऊन येतात नामांकित बियाणे कंपनीचे रोपे असल्याने यात फारसे नुकसान होत नाही
महिन्याकाठी दोन लाख मिळतात रोपवाटिका मध्ये भाजीपाला पिकाची रोपे असल्याने हि रोपे बागायती शेतकऱ्यांना आवश्यक असतात म्हणून वर्षाला किमान एक कोटी रोपे येथून विकली जातात एक रोपाची किमत एक रुपया २५ पैसे प्रमाणे असते. एका वर्षाला एक कोटी रोपे विकली जातात यातून मिळणारी सव्वा कोटी रुपयातून ८० टक्के रक्कम बियाणे, ट्रें खरेदी, खते, औषधी, नारळपीठ, मजुरी यांना जाते उर्वरित २० टक्के रक्कम निव्वळ नफा राहतो. एक वर्षाला २५ लाख रुपये मिळतात.
वेगळा प्रयोग म्हणून केली सुरुवात परंपरागत शेती करणे परवडत नसल्याने एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही दोघांनी ९ वर्षा पूर्वी रोपवाटिका सुरु केली. सुरुवातीला जेमतेम विक्री होत होती. शेडनेट नव्हते. २०१९ नंतर रोपवाटिकाचा विस्तार झाला. मागील दोन वर्षांपासून प्रत्येक वर्षी एक कोटी पर्यंत रोपे विकली जातात. यापासून आर्थिक फायदा होत आहे अशी माहिती शेतकरी बंधू गजानन आणि श्रीराम साबळे यांनी दिली.