शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

‘सिद्धार्थ’मध्ये २ वाघिणींनी दिला २६ बछड्यांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 6:33 PM

मनपाकडे निधी नसल्याने सफारी पार्कचे स्वप्न अधुरेच

ठळक मुद्देसिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात जागेची कमतरता१२ बछडे इतर ठिकाणी पाठविले

- मुजीब देवणीकर 

औैरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात १९९१ पासून आजपर्यंत वाघांच्या सहा जोड्यांनी तब्बल २६ बछड्यांना जन्म दिला. त्यातील १२ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. जागेअभावी प्राणिसंग्रहालयात आज ८ वाघ आहेत. मागील काही वर्षांपासून वाघांचे प्रजननही थांबविण्यात आले आहे. देशभरात वाघांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत असताना औरंगाबादेत वाघांची संख्या आटोक्यात ठेवण्यात येत आहे.

१९९१ मध्ये महापालिकेने प्राणिसंग्रहालयासाठी ओडिशा येथून पांढऱ्या वाघांची एक जोडी आणली होती. प्रमोद आणि भानुप्रिया असे या लोकप्रिय जोडीचे नाव होते. या जोडीने तब्बल दोन दशक पर्यटकांचे मनोरंजन केले. दोघांचाही वृद्धापकाळाने प्राणिसंग्रहालयातच मृत्यू झाला. त्यांच्यापासून तब्बल १५ बछडे जन्माला आले. त्यातील ८ बछडे देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांना वर्ग करण्याचे आदेश केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले. तब्बल ८ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात प्रमोद आणि भानुप्रिया यांच्या अपत्यापैकी एकमेव ‘वीर’ हा पांढरा वाघ शिल्लक आहे. 

२००५ मध्ये महापालिकेने पंजाब येथून चार पिवळे वाघ आणले. त्यांची नावे छोटू, गुड्डू, दीप्ती, कमलेश अशी आहेत. त्यांच्यापासून तब्बल ११ बछडे जन्माला आले. ५ बछडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनेनुसार देशभरातील इतर प्राणिसंग्रहालयात वर्ग करण्यात आले. तीन बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या प्राणिसंग्रहालयात ७ पिवळे वाघ आहेत. त्यात सिद्धार्थ, समृद्धी, अर्जुन, करिना, करिश्मा, शक्ती, भक्ती यांचा समावेश आहे.

सफारीपार्कचे स्वप्नमागील १० वर्षांपासून मिटमिटा येथे सफारीपार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा मनपातर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाने १०० एकर जमीनही मनपाला दिली. पार्क उभारणीसाठी मनपाच्या खिशात दमडी नसल्याने मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. मनपाने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण न केल्यास प्राणिसंग्रहालयाची आॅक्सिजनवर असलेली मान्यता कोणत्याही क्षणी रद्द होऊ शकते.

३ वर्षांपासून प्रजनन बंददेशभरातील लहान प्राणिसंग्रहालयांसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणातर्फे  वेगवेगळ्या सूचना देण्यात येतात. औरंगाबादेत वाघांचे प्रजनन पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात यावेत, असे आदेश प्राधिकरणाने तीन वर्षांपूर्वी दिलेले आहेत. सध्या प्राणिसंग्रहालयात एकूण ८ वाघ असून, ते चांगल्या स्थितीत आहेत.- विजय पाटील, प्रभारी संचालक, प्राणिसंग्रहालय

पिवळे वाघ 04 वाघ पंजाब येथून आणले11 बछड्यांना त्यांनी दिला जन्म05 बछड्यांचे स्थलांतर03 बछड्यांचा मृत्यू07 बछडे सिद्धार्थमध्ये

पांढरे वाघ01 नरमादी ओडिशा येथून आणले15 बछड्यांना जन्म दिला08 बछड्यांचे स्थलांतर08 बछड्यांचा मृत्यू01 बछडा सिद्धार्थमध्ये

टॅग्स :TigerवाघAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबाद