मराठवाड्यातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा यावर्षी प्रथमच बंद राहणार आहे. याबाबत तहसील प्रशासन सिल्लोड यांनी गावकरी व मंदिर समिती यांची बैठक शनिवारी घेतली. ११ मार्च महाशिवरात्रीपासून धूलिवंदनपर्यंत हा यात्रा महोत्सव साजरा होणार होता. यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली हा महोत्सव येत असल्याने प्रशासन व गावकऱ्यांनी हा यात्रा महोत्सव अत्यंत मर्यादित प्रमाणात कुठलीही गर्दी न होऊ देता साजरा केला. यावेळी गावकरी व प्रशासन यांची एक समिती स्थापन करून त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या काळात धोत्रा येथे गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गिरिधर ठाकूर, तलाठी, पोलीसपाटील, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
फोटो : धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज यांचा फोटो वापरावा...