वाळूज महानगर : महिनाभरापूर्वी वायरिंग जळाल्याने लिंकरोड चौफुलीवरील वाहतूक सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे या चौकात सतत वाहतुकीची कोंडी होतहोती. यासदंर्भात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाकडून या सिग्नलच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर व औरंगाबाद-पुणे या दोन्ही महामार्गाला जोडणाºया ए. एस. क्लब जवळील लिंकरोड वाहतूक सिग्नल उभारले आहे. या महामार्गाला जोडणाºया चौफुलीवर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी वाळूज वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत असतात. हे वाहतूक सिग्नल १४ एप्रिल रोजी बंद पडले. सिग्नलवरील वायरिंग जळाल्यामुळे सिग्नल बंद पडल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको प्रशासन, जागतिक बँक प्रकल्प, रस्ते विकास महामंडळ आदींकडे सिग्नल सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणतर्फे लिंकरोड चौफुलीवरील सिग्नलच्या दुरुस्तीचे काम तीन-चार दिवसांपूर्वी सुरु करण्यात आले आहे. या वाहतूक सिग्नलच्या दुरुस्तीचा खर्च राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण करणार असून, आगामी दोन-तीन दिवसांत सिग्नलच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक नाथा जाधव यांनी लोकमतशी बोलताना दिली.