सिल्लोड : तालुक्यातील ८ गट व १६ पंचायत समिती गणाची प्रभागरचना जाहीर करण्यात आली असून यात काही गावे वगळण्यात आली तर काही नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या गट व गणांची अंतिम प्रभागरचना अशी:-अजिंठा गट: अजिंठा व हळदा हे दोन गण आहेत. अजिंठा गणात अंधारी, अनाड, मुखपाठ, बाळापूर या गावांचा समावेश आहे. हळदा गणात डकला, वसई, गोळेगाव बू.,काजीपुर, गोळेगाव खु, पानस, खंडाळा,जळकी वसई,बोदवड, पिंपळदरी,सराटी या गावांचा समावेश आहे.शिवना गट: या गटात शिवना व पानवडोद बु.हे दोन गण असून शिवना गणात आमसरी, वाघेरा, नाटवी ही गावे आहेत. पानवडोद बु. गणात पानवडोद खु.,धोत्रा, डिग्रस, खुपटा, जळकी बाजार, मादनी, वडाळी ही गावे आहे.उंडणगाव गट :- उंडणगाव व अंभई हे दोन गण असून उंडणगाव गणात खुल्लोड, विरगाव, घाटाब्री,पांगरी,जनासी,नानेगाव तर अंभई गणात पिंपळगाव घाट,शेखपुर, सीरसाळा, सीरसाळा तांडा, केळगाव, केऱ्हाळा, आधारवाडी, नानेगाव, जंजाळा, रेलगाव या गावाचा समावेश आहे.घाटनांद्रा गट:- घाटनाद्रा व आमठाणा या गणातील घाटनांद्रा गणात धारला,चारनेर,चारनेरवाडी, धावडा, जांभई, तर आमठाना गणात चिंचवन, देउळगाव बाजार, देउळगाव वाडी , गोकुळपूर, पेंडगाव, जळकी घाट, बोजगाव, तळणी, शिंदेफळ, कोटनांद्रा या गावांचा समावेश आहे.पालोद गट :- पालोद व हट्टी या गणातील पालोद गणात अन्वी, डोंगरगाव, दहिगाव, आसडी व हट्टी गणात मोहाळ, रहीमाबाद, मांडणा, लिहाखेडी, सारोळा, चिंचपूर, बहुली ही गावे आहे.भराडी गट :- भराडी व केऱ्हाळा गणातील भराडी गणात कुतुबपुरा, वडोदचाथा, वडाळा, चांदापूर, वांगी बु., सासुरवाडा, वांगी खु. तर केऱ्हाळा गणात धानोरा, वांजोळा, मोढ़ा खु., मंगरुळ, मोढ़ा बु या गावांचा समावेश आहे.भवन गट :- भवन व निल्लोड या गणापैकी भवन गणात बाभुळगाव, चिंचखेडा, बनकिन्होंळा, पिंंप्री, वरखेडी, भायगाव, पळशी, गेवराई सेमी, वरूड खु. तर निल्लोड गणात बोरगाव कासारी, गव्हाली तांडा, गव्हाली, तलवाडा , टाकळी जीवरग, कायगाव, पिंपळगाव पेठ या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सिल्लोड : ८ गट, १६ गणांची प्रभागरचना जाहीर
By admin | Published: October 07, 2016 12:37 AM