लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे माती खोदकाम करीत असताना निजामकालीन चांदीच्या नाण्यांनी भरलेले मातीचे मडके सापडले. सदर चांदीची नाणी सापडताच खोदकाम करणाºयांनी ही रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र या वाटाघाटीची चर्चा झाल्याने पोलिसांना ही माहिती कळली आणि रविवारी त्यांनी हस्तक्षेप करुन ही नाणी ताब्यात घेतली.चांदीचे घबाड सापडल्याची चर्चा नेवरगाव परीसरात सुरु झाल्याने बिंग फुटले.मातीच्या मडक्यातील सव्वा किलो वजनाची ९० चांदीची नाणी पोलीसांनी जप्त केली. मात्र मडक्यात नेमकी किती नाणी होती हे अजून गुलदस्त्यात आहे.गंगापूर तालुक्यातील जुने नेवरगाव येथील राम मंदिराच्या बाजूला अतुल दुशिंग, अशपाक शहा व इतर दोन जण खोदकाम करत होते. त्यावेळी त्यांना हे मडके सापडले. यातील चांदीची नाणी त्यांनी आपसात वाटून घेतली.घबाडाचे बिंग फुटून ही वार्ता पोलिसांच्या कानी पडली. यावरुन नव्यानेच गंगापूर पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी कसून चौकशी केली असता ही बाब उघड झाली. त्यांना सदर व्यक्तींकडून २० नाणी मिळाली. यानंतर इतरांचीही नावे समोर आल्याने बिर्ला यांनी अन्य चार मजुरांकडून ७० नाणी जप्त केली.च्सापडलेल्या ९० चांदीच्या नाण्यांचा मंडळ अधिकारी सोमनाथ तोतला व तलाठी राऊत यांनी पंचनामा केला. सर्व नाणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कोषागार विभागात जमा केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांनी दिली. याठिकाणी नेमकी किती नाणी सापडली, हे अजून स्पष्ट झाले नाही. तुर्तास मजुरांच्या माहितीवरुन मडक्यातील सव्वा किलो वजनाची ९० चांदीची नाणी पोलिसांनी तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहे
नेवरगावात चांदीचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:42 PM