शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

सिंदफणा मध्यम प्रकल्प अद्याप कोरडा

By admin | Published: September 13, 2014 10:58 PM

शिरूरकासार : गेल्या पंधरा- वीस दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या- नद्यांना पाणी आले तर पाझर तलाव भरले. मात्र शिरूरकरांची तहाण भागविणारा

शिरूरकासार : गेल्या पंधरा- वीस दिवसात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या- नद्यांना पाणी आले तर पाझर तलाव भरले. मात्र शिरूरकरांची तहाण भागविणारा मोठ्या पोटाचा सिंदफणा मध्यम प्रकल्प अजूनही कोरडाच आहे. गणपतीच्या आगमनानंतर पावसाने जोर धरला होता. केवळ याच काळात तालुका परिसरात जोरदार वृष्टी झाली. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. जागोजागी पाणी साचल्याचे पाहून अनेकांना समाधान मिळाले होते. नद्या - ओढ्यांना पाणी आले होते. या पावसामुळे शिरूरकरांची तहान भागविणारा सिंदफणा प्रकल्प भरेल, अशी अपेक्षा अनेकांची होती. मात्र ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे. मध्यम प्रकल्प अद्यापही कोरडाच आहे. सरासरी इतका पाऊस झाला नसला तरी जेमतेम आलेल्या पावसाने टँकर बंद झाले. तालुक्यात जवळपास १२५ शेततळे डबडबले असून ओढे- नाले डोंगरदऱ्यातून पाणी खळखळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरूर शहराचे वैभव असणारी सिंदफणा नदी एक दिवसाचा महापूर घेऊन आली आणि निघून गेली. आज प्रवाह थांबला असला तरी सिद्धेश्वर बंधारा पूर्णपणे भरला आहे. त्याच बरोबर आनंदगाव, लोणी, मोरजळवाडी, पौंडुळ असे छोटे तलाव भरण्याच्या मार्गावर आहे. तहसील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव ६० टक्के, हिवरसिंगा ३० टक्के, नारायणगड ७० टक्के, बेलपारा १५ टक्के तर शिरूरला पाणीपुरवठा करणारा उथळा प्रकल्प ६५ टक्के भरला आहे. घाटशिळ प्रकल्पात देखील ४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मात्र सिंदफणा मध्यम प्रकल्पात अद्याप मोजपट्टी लावता येत नाही. तिंतरवणी सर्कमध्ये सर्वात अधिक पाऊस झाल्यामुळे पूर्ण पाझर तलाव भरले आहेत. एकटा सिंदफणा प्रकल्प सोडता सर्वत्र समाधानकारक चित्र पहावयास मिळत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी आले आहे. परिणामी पशुधनाच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शिरूर तालुका परिसरात ठिकठिकाणी हिरवेगार चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)