जालना : इंदेवाडी येथील सॅटेलाईट केंद्राचे प्रमुख अजय सिंघल हे संयुक्त राष्ट्राच्या दूरसंचार बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ही बैठक होत आहे. या बैठकीत रेडिओ तसेच टेलिव्हिजन प्रसारणाबाबत काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. या बैठकीत सिंघल प्रतिनिधित्व करून भारताची नभोवाणी व दूरचित्रवाणीबाबत भूमिका मांडणार आहेत. आईटीयू संस्थेत १९२ सदस्य राज्य असून, सातशे पेक्षा अधिक संस्था संलग्न आहेत. सिंघल यांच्या निवडीबद्दल स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)
सिंघल भारताचे प्रतिनिधित्व करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 11:58 PM