छत्रपती संभाजीनगर : सौर कृषिपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात केवळ १४,७४२ शेतकऱ्यांच्याच मागणीची पूर्तता झाली असून, ते वापरताना शेतकऱ्यांना कमी व्होल्टेज मिळत असल्याने पाणी भरण्यासाठी अडचणी येतात.
काय आहे सौर कृषिपंप योजना?महाकृषी ऊर्जा अभियान पीएम-कुसुम योजना आणली आहे. पीएम-कुसुम सौरपंपासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर कृषिपंप दिला जातो. नापिकीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जमिनीवर कृषी उत्पादन घ्या आणि शेतात सोने पिकवा. असे केल्याने पीएम कुसुम पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. वीज नसली तरी दुर्गम भागात, कृषी उत्पादकांना पर्वणीच आहे.
सौर कृषिपंपांचे वाटप केवळ १४,७४२ जणांचीच पूर्तता झाली असून, ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी, पाहणी, मंजुरी आणि प्रत्यक्ष सौरपंप बसविणे अशा विविध प्रक्रियांतून जावे लागते.
प्रेशर येईना अन् वीजही मिळेना सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे कृषी पंपाला प्रेशर येत नाही. पंपही व्यवस्थित चालत नाहीत. उन्हाचा पारा चांगला असेल तरच कृषिपंपही व्यवस्थित चालतो.
सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर सौरपंप देण्यात येत आहेत; त्यामुळे वीज गुल झाल्याने घुसमट होणार नाही आणि केव्हाही ओसाड माळरानावर फुलविली शेती तरी कुटुंब समाधानी आहे.- कारभारी गायके
पाणी भरण्यासाठी ओकेवीजपुरवठा केव्हाही खंडित होतो. तो पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना उभे पीक जाताना पाहून काळजाचा थरकाप उडतो. सौरपंप ही चांगली संकल्पना आहे.- दिलीप हिवराळे
ढगाळ वातावरण असेल तरच त्रासढगाळ वातावरण असेल तर सौरपंप हा कमी क्षमतेने व अल्पकाळ चालतो; परंतु वीजपुरवठ्याची प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. यामुळे पिकांचेही नुकसान टळते. पीक घेण्यासाठी विहिरीत पाणी असले तरी वीजच नसेल तर काय फायदा?- बाबूलाल फुलवाळी
अडचण काय?सौरऊर्जा पंपाला जर स्टोअरेज क्षमता वाढविण्यासाठी ठरवून दिलेल्या काही यंत्रणा, उपाययोजनाचा फायदा घेतला तर सौरपंप हा व्यवस्थित चालू शकतो. तुम्ही कोणता सौरपंप घेतला यावरही ते अवलंबून आहे. अधिक माहितीसाठी तांत्रिक विभागाशी संपर्क साधून आपण अडचणी दूर करू शकता.- महाऊर्जा अधिकारी