छत्रपती संभाजीनगर : सर, तुम्हीच माझे देव आहात... एवढ्यावेळेस मला पास करा, बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत हे व अन्य आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुनावणी बोर्डात सुरू आहे.
फेब्रुवारी- मार्चमध्ये झालेल्या दहावी- बारावी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागीय शिक्षण मंडळात सुनावणी झाली. यात दहावीच्या २९ आणि बारावीच्या १०२ कॉपी केसेसमध्ये विद्यार्थी त्यांचे पालक आणि गरज पडलेल्या प्रकरणात केंद्रावरील पर्यवेक्षकांची समितीसमोर सुनावणी झाली.
आजपासून उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुनावणी सुरू झाली आहे. यात उत्तरपत्रिकेत कोणी तुम्हीच माझे देव आहात... मला पास करा, कोणी मोबाईल क्रमांक, तर काहींनी कविता, गाणे लिहिलेली आहेत. यासंदर्भात उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या अहवालानुसार बोर्डाने टप्पाटप्प्याने सुनावणीला सुरुवात केल्याचे विभागीय शिहण मंडळाचे सचिव विजय जोशी यांनी सांगितले.