बँकेजवळच घर असल्याने बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत शाखा व्यवस्थापक भोई यांनी बँकेत काम केले. त्यानंतर ते घरी गेले. तोच रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान बँकेतील तिजोरीजवळ असलेल्या सायरन वाजायला सुरुवात झाली. अचानक सायरन का वाजू लागले म्हणून शाखा व्यवस्थापकांनी शिपायासह धाव घेतली. तेव्हा बँकेचे शटर उघडण्याचा आवाज आल्याने आतमध्ये असलेल्या चोरट्याने पाठीमागील खिडकीच्या जाळीतून उडी मारून पळ काढला. तिजोरीला लावण्यात आलेल्या सायरनमुळे चोरीचा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक भारतकुमार भोई यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड, सपोनी किरण बिडवे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या घटनेने चोरीचे सत्र सुरूच असून पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.
फोटो : घाटनांद्रा येथील ग्रामीण बँकेच्या इमारत दुसऱ्या छायाचित्रात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा