शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 6:53 PM

Six buffaloes die due to electric shock in Paithan : ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या.

ठळक मुद्देएकाच वेळी सहा म्हशी मरण पावल्याने पशुपालकाच्या परिवाराने फोडला हंबरडाफोन आल्यामुळे मुलाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

पैठण : शहरालगत पाचोड रोडवरील ओढ्याच्या डोहात शनिवारी दुपारी पाणी पिण्यासाठी उतरलेल्या म्हशीवर विद्युतवाहिनी तुटून पडल्याने सहा म्हशी मरण पावल्या. सुदैवाने या घटनेत एक गाय वाचली. मात्र, विद्युत शॉक बसल्याने गाय अर्धमेल्या अवस्थेत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या गायीवर उपचार करत आहेत. सदर सहा म्हशी एकाच मालकाच्या असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. 

पैठण शहरातील शंकर सदाशीव काटकर ( रा. इंदिरानगर ) यांच्या मालकिच्या पाच म्हशी, एक रेडा व एक गाय आज नेहमीप्रमाणे पाचोड रोडवरील वनवे जिनिंग पाठिमागील  परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. दरम्यान,  गाय वगळता सर्व जनावरे परिसरातील ओढ्यात उतरली. दुर्देवाने ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या. ओढ्याच्या किनाऱ्यावर असलेल्या गायीला सुद्धा विद्युत धक्का बसला असून ती अर्धमेल्या अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, नगरसेवक ईश्वर दगडे व इंदिरानगर भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत पुरवठा बंद करून ट्रक्टरच्या सहाय्याने म्हशीचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास भुजंग यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले. एकाच वेळी सहा म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्या परिवाराने फोडलेला हंबरडा उपस्थितांना हेलावून गेला. महावितरणने  संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के यांनी केली आहे.

फोन आला आणि मुलगा वाचलाशंकर काटकर यांचा मुलगा म्हशी पाठिमागे होता. म्हशी पाण्याबाहेर काढण्यासाठी तो डोहात जात असतानाच त्याला मोबाईलवर कॉल आला. यामुळे तो दूरवरच बोलत थांबला. याच वेळेस पाण्यात विद्युतवाहिनी तुटून पडली. फोन आल्यामुळे मुलाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

दीड महिन्यात दुसरी घटना याच परिसरातील काही अंतरावर असलेल्या डोहात २१ नोहेंबर २०२० रोजी पैठण शहरातील अनवर पाटणी यांच्या चार म्हशी अशाच प्रकारे विद्युतवाहिनी पाण्यात पडल्याने मरण पावल्या होत्या.  दिड महिन्याच्या आत दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. पोलवरील विद्युत तारेची तपासणी नियमित न केल्याने महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. तसेच अशा घटनेने पशुपालाकांचे मोठे नुकसान होत असल्याने महावितरणने तत्काळ सर्व विद्युतवाहिन्यांची तपासणी करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सात तारखेला मुलीचे लग्न, म्हशीवरच होता उदरनिर्वाह इंदिरानगर येथील शंकर काटकर यांचा उदरनिर्वाह म्हशीवर अवलंबून होता. म्हशीचे दूध काढून विक्री करणे हाच काटकर यांचा व्यवसाय. परंतू, अचानक सहा म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्यावर आभाळ कोसळे आहे. उदरनिर्वाहाचे साधनच नियतीने हिरावून घेतल्याने काटकर परिवार हादरून गेला आहे. जवळपास सहा लाख रूपयाचा म्हशी मरण पावल्या असून उदरनिर्वाहाचे साधनही हातातून गेले आहे. यातच काटकर यांच्या मुलीचा विवाह दि. ७ जानेवारी रोजी होणार आहे. सहा पैकी दोन म्हैस विकून विवाहाचा खर्च करण्याचे त्यांनी ठरवले होते. दुर्दैवाने सहाही म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्यावर संकट कोसळले आहे. आता विवाहाचा खर्च कसा करावा असा प्रश्न काटकर कुटुंबासमोर उभा राहिला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूAgriculture Sectorशेती क्षेत्र