लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये ३१ जुलैपर्यंत दोन लाख ४५ हजार ५८७ शेतकºयांनी सतरा कोटी ६५ लाखांचा पीकविमा भरला आहे. आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात आलेले अर्र्ज आॅनलाइन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष देशमुख यांनी शुक्रवारी दिली.जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांमध्ये पीकविम्याचे शेकडो अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर अर्ज आॅनलाईन करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत १०० अधिकचे संगणक बसविण्यात आले आहेत. शिवाय स्व. अंकुशराव टोपे महाविद्यालय, पार्थ सैनिकी शाळा व अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे संगणक लॅबमध्ये पीकविमा अर्ज आॅनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँका व सीएससी सेंटरवर पीकविमा भरण्यास चार आॅगस्टपर्यंतची मुदत होती. परंतु राष्ट्रीयीकृत बँका पीकविमा घेण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकºयांनी या बँकांकडे पाठ फिरवल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. तर कॉमन सर्व्हिस सेंटरवर विमा भरण्यासाठी आजही अनेक अडचणी आल्या. क्रॉप इन्शुरन्स वेबसाईट बंद पडल्याने एक पीकविमा अर्ज भरण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागला. दरम्यान, सीएससी सेंटरवर विमा भरण्याचे काम ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. एकूण किती शेतकºयांनी आॅनलाईन पद्धतीने पीकविमा अर्ज भरला याची निश्चित आकडेवारी शनिवारपर्यंत उपलब्ध होईल, असे संबंधित अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण शेतकºयांची संख्या साडेचार लाखांवर आहे. गत वर्षी चार लाख ६७ शेतकºयांनी पीकविमा भरला होता. या वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेने दोन लाख ४५ हजार शेतकºयांचा पीकविमा स्वीकारला. पीकविम्याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांची भूमिकाही उदासीन असल्याचे दिसून आले.
जिल्हा बँकेने स्वीकारला साडेसतरा कोटींचा विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:47 AM