शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शहरातील आकाश अमृत मशीनचे होतेय भंगार..!

By admin | Published: June 01, 2017 12:32 AM

जालना : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेल्या सर्वच आकाश अमृत मशीन बंद पडल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेल्या सर्वच आकाश अमृत मशीन बंद पडल्या आहेत. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकीत्सक यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामणी भागातून येणाऱ्या ग्रामस्थांचे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वंयसेवी संस्थासह कॉर्पोरेट कंपन्यांना विनंती करुन या अमृत मशिन्स शहरासह काही ग्रामीण भागात बसविल्या होत्या. कुठल्याही जलस्रोताच्या वापराविना थेट हवेतील आद्रता शोषून घेऊन ते पिण्यायोग्य बनविण्याचे तंत्रज्ञान असलेल्या तेरा आकाश अमृत मशीन जालना जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जुलै २०१५ दरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून बसविण्यात आल्या. या मशिनची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्या त्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसा करारही करण्यात आला. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या आकाश अमृत मशीनच्या पाण्याने अनेकांनी तहान भागवली. मात्र, काही महिन्यांतच आकाश अमृत मशीनचा वापर बंद झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात आलेल्या तीनही आकाश अमृत मशीन बंदावस्थेत आहेत. परतूरमधील तहसील कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, शासकीय रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनही बंदच आहेत. मंठा, वाटूरमध्ये बसविलेल्या या मशीनची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेल्या या मशीन सध्या धूळखात आहेत.