औरंगाबाद : एसटी महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबादहून विविध मार्गांवरील स्लीपर शिवशाही बसच्या दरात ३४५ रुपयांपर्यंत कपात होणार आहे.एसटी महामंडळाने शिवशाही स्लीपर बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. राज्यातील विविध ४२ मार्गांवर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. औरंगाबादहून सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातून मुंबई, पुणे, नागपूर, अकोला मार्गांवर शिवशाही स्लीपर बस धावते. या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दर कपातीमुळे प्रवाशांचा आणखी प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दर कपात करीत खाजगी वाहतूकदारांबरोबर सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत-जास्त प्रवासी वाढविण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरूकरण्याची तयारी केली आहे. तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असून प्रवाशांनी सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासासाठी शिवशाही शयनयान बसचा वापर करावा , असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.काही मार्गांवरील दरमार्ग सुधारित दर (प्रौढ) सध्याचे दर फरकऔरंगाबाद - मुंबई ८२० १०९५ २७५औरंगाबाद-पुणे ५०० ६६५ १६५औरंगाबाद-नागपूर १०२० १३६५ ३४५औरंगाबाद - अकोला ५२० ६९५ १७५
स्लीपर शिवशाही’च्या तिकीट दरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:10 PM
एसटी महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबादहून विविध मार्गांवरील स्लीपर शिवशाही बसच्या दरात ३४५ रुपयांपर्यंत कपात होणार आहे.
ठळक मुद्दे१३ फेब्रुवारीपासून लागू : औरंगाबादहून विविध मार्गांवरील बसभाड्यात ३४५ रुपयांपर्यंत कपात