- बापू सोळुंकेऔरंगाबाद : महिलांच्या सुरक्षिततेविषयी सतत चर्चा होत असते. महिलांसाठी शहर सुरक्षित असल्याचा दावाही वेळोवेळी पोलिसांकडून केला जातो. मात्र, गतवर्षी महिलांविषयी झालेल्या घटनांचा विचार करता शहरातील महिला खरंच सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होतो.
२०२० या वर्षाच्या तुलनेत शहरातील महिलांसंबंधीचे गुन्हे किंचित वाढले आहेत. गतवर्षी दोन महिलांचे खून, सहा महिलांच्या खुनाचे प्रयत्न झाले. बलात्काराच्या ८८ तर १९९ विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली. मात्र, पोलिसांनी बहुतेक गुन्हेगारांना त्यांची जागा दाखविली. गतवर्षी २०२१ साली पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल झालेल्या ६७९ पैकी ६६० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली.
अपहरण झालेल्या महिला, मुलींचे काय होते ?अल्पवयीन मुली अथवा १८ वर्षांपुढील महिलांच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच पोलीस अशा महिलांचा शोध घेतात. अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यांचा तपास फौजदार दर्जाचे अधिकारी करतात. बहुतेक मुली प्रेमप्रकरणातून स्वतःहून निघून जातात. तर काहींना फूस लावून पळवून नेण्यात येते. अशा मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथक असते.
मुलांना चांगले संस्कार द्यावे आज सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महिलांना कमजोर समजून अत्याचार करण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. पालकांनी लहानपणापासून मुलांना महिला, मुलींचा आदर करायला शिकविले तरच महिलांसंबंधी गुन्हे कमी होतील.-वैभव घुले, सामाजिक कार्यकर्ता.
महिलांसंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारीसन २०१९----- २०२०-------२०२१खून- ०९-------००-------०२खुनाचा प्रयत्न--११----०३----०६हुंडाबळी-----०३-----०४-----०५आत्महत्या----१८-------११---१०बलात्कार--८५-----८४----८८अपहरण---१३०----९७-----१००विनयभंग---३०१----२४५----१९९अनैतिक देह व्यापार--०३-----०७---०१मंगळसूत्र चोरी- ३८---२४विवाहितेचा छळ--२०६-----२६२