औरंगाबाद : इंदूरच्या सावकाराला ३० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या कापूस व्यापाऱ्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिलेश सोनी (रा. सिडको एन-३), असे आरोपीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले की, धन्नालाल गोयल (७४) हे इंदूर येथे सावकारीचा व्यवसाय करतात. गेल्यावर्षी त्यांची ओळख अखिलेश सोनी याच्यासोबत झाली होती.ओळखीचा फायदा घेत सोनी याने गोयल यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात सोनीकडून काही धनादेशदेखील घेतले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात हा व्यवहार झाला. एक वर्षानंतर म्हणजे ३० मे रोजी गोयल यांनी हे धनादेश बँकेत वटण्यासाठी जमा केले. धनादेशावरील सही बनावट असल्याने ते न वटता परत आले. सोनी याने जालना येथील व्यापाऱ्याला ५८ लाख रुपयांना चुना लावला होता.
३० लाखांचा सावकाराला गंडा
By admin | Published: June 01, 2016 12:07 AM