शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘एआय’ टूल्सचा स्मार्ट वापर; ६३ हजार २०७ मतदारांची डबल नावे शोधली

By विकास राऊत | Published: January 25, 2024 2:02 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ लाख ९३ हजार मतदार मतदानासाठी पात्र

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या २९ लाख ९३ हजार ४०३ वर गेली आहे. यामध्ये १ लाख २० हजार ६६० नवीन मतदारांची नोंदणी झाली. यादीतील ६३ हजार २०७ मतदारांचे फोटो, दोन वेळा असलेली नावे वगळण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा प्रथमच वापर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

२३ जानेवारी २०२४ पर्यंतच्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५ लाख ७० हजार ७३९, स्त्री मतदार १४ लाख २२ हजार ५३१ व तृतीयपंथी मतदार १३३ अशी एकूण मतदारसंख्या २९ लाख ९३ हजार ४०३ इतकी आहे. १ लाख २० हजार ६६० इतकी नवीन मतदार नोंदणी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार पश्चिम मतदारसंघात आहेत.

१ लाख २० हजार ६६० नवमतदार....१८ ते १९ या वयोगटातील मतदारांची अंतिम यादीत ३४ हजार १०९ इतकी संख्या झाली आहे. २० ते २९ या वयोगटाची मतदार संख्या ६ लाख ४ हजार ८५८ इतकी आहे. १ लाख २० हजार ६६० नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात २८९८ मतदान केंद्रे असतील. यात अतिरिक्त ८६ केंद्रे साहाय्यकारी असतील.

११ हजार मतदारांनी सोडला जिल्हा...११ हजार ९५ मतदारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडला आहे. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यातील मतदार यादीत नावे नोंदविली असावीत. १ हजार पुरुषांमागे ९०६ महिला मतदारांची संख्या आहे.

कोणत्या मतदारसंघात किती मतदार?छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रातील २० लाख ७ हजार ३०५ मतदार असतील. तर जालना लोकसभा मतदारसंघात ९ लाख ८६ हजार ९८ मतदार असतील.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्याविधानसभा मतदार संघ ..... पुरुष मतदार..... स्त्री मतदार संख्या .... इतर ...... एकूण मतदारछत्रपती संभाजीनगर मध्य ....१७४६२९....... १६४४१२ ...........४ ................ ३३९०४५छत्रपती संभाजीनगर पश्चिम ....१९७५४५ ...... १७६८६५....... ७५ ............... ३७४४८५छत्रपती संभाजीनगर पूर्व ..........१७१०७४ ...... १५५८१६ ..... १० ................ ३२६९००कन्नड                         ................. १६९३७५ .................... १५२३७३ ............ ८........... ३२१७५६गंगापूर                         ...............१७७७५०....................... १६०१८८             .............. २१ ............. ३३७९५९            वैजापूर                         ................. १६०८८९ ...................... १४६२६८...........३................... ३०७१६०            सिल्लोड ....................... १७६२५६................ १५७८१४...... ३................. ३३४०७३फुलंब्री ............... १८०८७६ ................. १६२४४६ ............... ५ ........... ३४३३२७पैठण ................... १६२३४५ .................. १४६३४९ ............. ४ .............. ३०८६९८एकूण................... १५७०७३९ .................... १४२२५३१             ............ १३३ ........... २९९३४०३

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद