लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या नोंदणीकृत मोबाइलवर अभिनंदन आपणास कर्जमाफी मिळाली आहे, असा संदेश प्राप्त होणार आहे. त्यामुळे संबंधित शेतकºयाला कर्जमाफी मिळाल्याची खात्री होणार असून, शासनाकडून या योजनेचा प्रचार-प्रसारही होणार आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी मराठवाड्यात जालना जिल्ह्याची प्रथम निवड करण्यात आली आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आपले अर्ज आॅनलाइन केले आहेत. प्राप्त अर्जांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्यांचे मंगळवारी एकाच वेळी तलाठी, ग्रामसेवक व कृषिसाहाय्यकाच्या उपस्थितीत गावनिहाय चावडी वाचन होणार आहे. यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित बँकांचे प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात आली आहे. चावडी वाचन करताना ग्रामस्थांना आपल्या शंका विचारता येणार आहे. तसेच समितीकडे आपले म्हणने मांडता येणार आहे. त्यानुसार समिती संबंधित शेतकºयाच्या नावासमोर शेरा मारून आवश्यक नोंदी घेणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना ज्या शेतकºयांचे कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशांना चावडी वाचन पूर्ण झाल्यानंतर तालुका समितीमार्फत कागदपत्रांची पूर्तता करून कर्जमाफीचा अर्ज पुन्हा भरता येणार आहे.शेतकºयांनी कर्जमाफीसाठी ज्या वेबसाईटवर अर्ज भरले आहेत, त्याच वेबसाईटवर आता बँका आपल्या थकबाकीदार शेतकºयांची माहिती आॅनलाइन भरणार आहेत. त्यानंतर संगणक विशिष्ट सॉफ्टेवअरच्या मदतीने कर्जमाफीस पात्र, अपात्र व अपूर्ण कागदपत्रे असणाºया शेतकºयांची यादी तयार करणार आहे. कर्जमाफीसाठी एक पेक्षा अधिक अर्ज किंवा दोन बँकांमध्ये अर्ज भरणाºया शेतकºयांची माहिती लगेच कळणार आहे. संगणकाद्वारे स्वयंलचिलीत पद्धतीने तयार करण्यात आलेल्या यादीत पात्र झालेल्या शेतकºयांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. एकंदरीतच कर्जमाफी योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
कर्जमाफीनंतर एसएमएस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:35 AM