बीड : जिल्हा शांतताप्रिय आहे, ही ओळख यापुढे कायम ठेवायची असेल तर विधायक उपक्रमांची जोड देऊन सणोत्सव साजरे करा, असे आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी गुरूवारी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी नागरिकांशी थेट संवादही साधला.बैठकीला पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अतिरीक्त अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक गणेश गावडे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर, शहर ठाण्याचे निरीक्षक एस. बी. पौळ व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी उत्सवाच्या काळात करावयाची उपाययोजनांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शांतता अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. उत्सवकाळात शहरात गस्त वाढविण्यासही त्यांनी सांगितले.शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सूचना त्यांनी जाणून घेतल्या. संवाद साधताना ते म्हणाले की, परस्पर स्रेह ठेवून नागरिकांनी सणोत्सव शांततेत साजरे करावेत. मिरवणुकीमध्ये शिस्त आणि नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे शांततेचा भंग होणार नाही. यासाठी मद्यपींना मिरवणुकांमध्ये थारा देऊ नये, अशी ताकीदही त्यांनी दिली. बाप्पांसमोर वाजवण्यात येणारी गाणे अश्लील असता कामा नये, आपल्यामुळे कोणाच्याही भावना दुखावू नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)गणेशोत्सवात मिरवणूक मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे व एकाच वेळी दोन मंडळांच्या मिरवणुका आल्यावर वादाचे प्रसंग उद्भवतात.४या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी शहरात मिरवणूक मार्गाची सकाळी पाहणी केली.४छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कारंजा चौक, बलभीम चौक, धोंडीपुरा, सुभाष रोड या मार्गावरून ते स्वत: फिरले. धोंडीपुरा भागात तर ते गाडीतून खाली उतरून पायी गेले.४मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशा सूचना त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
समाजोपयोगी उपक्रम राबवा
By admin | Published: August 26, 2016 12:17 AM