औरंगाबाद : लाॅकडाऊननंतर अनलॉक झाले आणि पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू झाली. मात्र, कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसतानाच बसमध्ये प्रवास करताना सॅनिटायझर, मास्कचा प्रवाशांना विसर पडल्याचे रिॲलिटी चेकमधून समोर आले आहे.
सिडको बसस्थानकातून तिकीट खिडकीवर जालन्याचे तिकीट काढले अन् बसने प्रवास सुरू झाला. जेमतेम २८ प्रवासी घेऊन बस जालन्याकडे मार्गस्थ झाली. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व मास्क पाहूनच प्रवेश मिळेल, असे वाटले; परंतु चालक व वाहकाने घेतले का तिकीट, चला मग पटापट बसमध्ये बसा. गाडी सरळ जालन्याच्या दिशेने निघाली. तुम्ही मास्क लावा, सॅनिटायझर वापर करा, अंतर सोडून बसा, असं कुणीही म्हटलं नाही.
एकदा तिकिटे काढून बसले की बस सरळ जालन्यात जाऊन थांबते. रस्त्यात कोणी प्रवासी उतरला नाही. परंतु बदनापूर व किरकोळ दोन ठिकाणी प्रवासी इच्छित थांब्यावर उतरले.
- चालकाने सिडको स्थानकापासून तोंडाला मास लावून ठेवला होता. तो त्यांनी काढला नाही.
- वाहक तोंडाला रुमाल गमच्या लावून आणि मोबाइलवर कथन करत एसटी अखेर जालना स्थानकात जाऊन पोहोचली.
एका प्रवाशाने चेहऱ्यावर फेसशिल्ड आणि मास्क लावलेला होता. इतर प्रवासी आपल्या तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बसले होते.
पाणी बाटल्या, वेफरची विक्री
तोंडावर मास्क नाही आणि पाणी बाॅटल, पाॅपकार्न, वेफर्स विक्रीसाठी येऊन फेरीवाला बसमध्ये शिरला. फेरीवाल्याने जोरदार आवाज लावून पाणी बॉटल, चिप्स विक्री केली. परंतु त्याने तोंडाला मास लावलेला नव्हता. यामुळे कोरोना कसा थांबेल. ऑनलाइन झाले असले तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.
प्रवासी मोठ्या प्रमाणात बाहेर निघाले असले तरी बसमध्ये खचाखच गर्दी होताना दिसत नाही. अनेकजण मास्क तोंडाला न लावता हनुवटीवर घेऊन बसमध्ये बसले होते.
- बसमध्ये २८ प्रवाशांपैकी काही प्रवाशांनीच शासन नियमांचे पालन केले होते. अन्यथा प्रत्येक सिटवर दोनजण बसले होते.
- अनलाॅक झाले असले तरी प्रत्येकाने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे याच गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
बहुतांश प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवली असून, बसला अद्याप गर्दी होताना दिसत नाही. प्रवासी संख्या बसमध्ये जेमतेम दिसत असली तरी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचा विसर नागरिकाला पडलेला दिसत आहे.
फोटो कॅप्शन....
बसमध्ये रिॲलिटी चेक करीत असताना मास्क न घातलेला पाणी बाटली विकताना फेरीवाला.