तालुक्यात दिवंगत भाऊसाहेब मोरे यांच्या पुढाकाराने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा डांगरा (मकरणपूर) येथे घेण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या तालुक्याचे प्रथम आमदार बाबूराव औराळकर यांनी आंबेडकरी समतेच्या विचारासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी कार्य केले होते. दिवंगत वामनराव पगारे व भाऊसाहेब मोरे यांनी समाजातील अंधश्रद्धा, वाईट प्रथा, नवस, अंगात येणे आदी कुप्रथेविरुद्ध जनजागृतीचे कार्य केले. त्यामुळे औराळा हे विशेष ऐतिहासिक गाव आहे. चित्रकार राजानंद सुरडकर, बुद्धविहार स्मारक समिती व अभ्यास केंद्राचे डॉ. भारत पगारे, मुख्याध्यापक केरुबा पगारे, माणिक पगारे, राजेंद्र पगारे आदींनी आमदार उदयसिंग राजपूत यांची भेट घेत यासाठी निधी देण्याची मागणी मान्य केली. आगामी एक जुलैपासून बुद्धविहार व अभ्यास केंद्र उभारण्याच्या कामास सुरुवात होणार असल्याचे सरपंच सोनाली बागुल, उपसरपंच आकाश पगारे यांनी स्पष्ट केले.
--- फोटो
190621\img-20210619-wa0101_1.jpg