लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : आधुनिक समाज व्यवस्थाच वाढत्या स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार आहे. त्यामुळे संस्कार असलेल्या संत साहित्याची गरज वाढली आहे, असा सूर अखिल भारतीय संत साहित्य संमेलनातील दुसऱ्या सत्रातील ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयावरील परिसंवादात निघाला. अध्यक्षस्थानी हभप डॉ. रामकृष्ण लहरीकर होते. ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर, डॉ. सुधा कांकरिया, सई गोरे या वक्त्यांनी परिसंवादात विचार व्यक्त केले. यावेळी नानिवडेकर म्हणाल्या, समाजाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न स्त्रीभ्रूण हत्या आहे. या प्रश्नाचं गांभीर्य ओळखून संत साहित्य संमेलनात हा विषय ठेवला गेला. पूर्वी एक-दोन नव्हे, तब्बल आठ-आठ मुलींना माता जन्म द्यायच्या. कारण त्यावेळी वाढणारा गर्भ मुलीचा आहे, हे कळत नव्हते. त्यामुळे गर्भपाताचा प्रश्नच नसायचा. गर्भलिंगनिदान चाचणी झाली नसती, तर हा ज्वलंत प्रश्न निर्माणच झाला नसता. याला आधुनिक समाज व्यवस्थाच जबाबदार आहे, असेही त्या म्हणाल्या. सई गोरे म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्या माणुसकीला काळिमा फासणारा कलंक आहे. स्त्रीभ्रूण हत्येचा कायदा आणखी कडक व्हायला हवा.
स्त्रीभ्रूण हत्येला समाज व्यवस्था जबाबदार
By admin | Published: May 30, 2017 12:28 AM