विद्यापीठ व ‘एमआयटी’च्या संयुक्त उपक्रमाद्वारे आयोजित या उपक्रमांतर्गत एकूण १५० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यांना ताबडतोब मातीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये व विहिरीच्या पाण्याचे प्रमाणीकरण करून देण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वनाथराव चव्हाण यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी चिकलठाण गावचे सरपंच शिवाजी धनेधर, उपसरपंच कीर्ती काकासाहेब काळे, दत्तू जाधव, प्रताप चव्हाण, युवराज चव्हाण, राजेंद्र परसे, संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, सोपान जाधव, दत्तू जाधव, आप्पासाहेब दले, चंद्रशेखर काळे, अरुण चव्हाण, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.
या योजनेचे समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. भारती गवळी, डॉ. अरविंद धाबे, डॉ. प्रवीण यंनावार, डॉ. रमेश मंझा, रामदास गोरे, तसेच एमआयटी माती परीक्षण विभागाचे डॉ. बोरणारे, योगेश पाटील, नागेश पाटील, मंगेश मुंडे, अमोल निकम, प्रियंका डोंगरे, दीपाली दुसाने, सोनल पठारे व विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.