शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवले अन् २००० चे बिल आले १५० रुपयांवर

By साहेबराव हिवराळे | Published: January 18, 2024 8:04 PM

भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे.

वाळूज महानगर : घरातील वीज बिलावर मोठा खर्च करण्यापेक्षा सौर ऊर्जा पॅनल घरावर बसवल्यास पूर्ण घर उजळून निघत आहे. सौर ऊर्जेची वीज वापरल्यास अर्थार्जनासह सबसिडीचा लाभ मिळू शकतो. ज्यांना दोन हजारांचे बिल येत होते, ते आता १५० रुपये येत आहे. बहुतांश घरांमध्ये फक्त १ ते २ किलो वॅटची सोलार सिस्टम बसवली आहे. फ्रीज, कूलर, पंख्यासारखी घरगुती उपकरणे अशा सोलार सिस्टमवर आपण सहज चालवू शकतो. पण अनेकांच्या घरात एअर कंडिशनर बसवलेले असतात, त्यांना मोठी सौर यंत्रणा लागते.

एका दिवसात फक्त १५ युनिट वीज निर्माण...जर तुम्ही तुमच्या घरात ३ किलो वॅटची सोलर सिस्टम बसवण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला हे जाणून घ्या की, ३ किलो वॅटची सोलर सिस्टम एका दिवसात फक्त १५ युनिट वीज निर्माण करू शकते.

३ किलो व्हॅट सोलार सिस्टम बसविण्याचा खर्चस्मार्ट ३ केवी सोलार इन्व्हर्टरवास्तविक, बहुतेक कंपन्या तुम्हाला ३५०० व्हॅट इन्व्हर्टर देतात. याच्या साह्याने तुम्ही ३ किलो व्हॅटची सोलार सिस्टम बसवू शकता. परंतु काही कंपन्यांमध्ये ४ केवी व्हॅटचा सोलर इन्व्हर्टर मिळतो. जेणेकरून तुम्ही ३ किलो व्हॅटची सौर यंत्रणा तयार करून ४ केवी व्हॅटच्या सोलर इन्व्हर्टरवर, ३ किलो व्हॅट्सचा भार चालवू शकता.

पॅनलसाठी किती अनुदान?भारतात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर रूफटॉप योजना सुरू केली आहे. कोणत्याही विक्रेत्याकडून छतावर सौर पॅनेल लावून सबसिडीसाठी अर्ज करावा. रूफटॉप सोलर पॅनल ३ केवी व्हॅटपर्यंत बसवले तर सरकारकडून ४० टक्के किंवा १ केवी सोलारसाठी १४५०० रुपये याप्रमाणे ४३५०० रुपये व याशिवाय १० किलो व्हॅटवर २० टक्के सबसिडी आहे.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज