शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

काहींनी नोकरी, करिअरमुळे तर काहींनी गर्भात दोष असल्याने केला गर्भपात, वर्षभरात ४९० केस

By संतोष हिरेमठ | Published: January 25, 2024 5:38 PM

गर्भपातांच्या संख्येत किंचित घट : कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात

छत्रपती संभाजीनगर : नोकरी करायची आहे, करिअर घडवायचे आहे. पहिले बाळ अजून लहान आहे, आता लगेच दुसरे बाळ नको, यासह अनेक कारणांनी नको असलेला गर्भ काढून टाकला जातो. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात ४९० गर्भपात झाले.

गर्भपात म्हटले की, अगदी हळू आवाजात बोलले जाते. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते. मात्र, गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटीत महिन्याला ४० ते ४५ गर्भपात होतात.

कायदेशीर गर्भपाताची कारणे काय? गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असेल, तसेच इतर काही कारणांमुळे वैद्यकीय सल्ल्याने आणि कायदेशीररीत्या गर्भपात करता येतो. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात केले जातात. २०२२च्या तुलनेत झाली घट घाटीत २०२२ मध्ये ५२७ गर्भपात झाले होते. या तुलनेत २०२३ मध्ये गर्भपाताचे प्रमाण कमी राहिले. तर २०२१ मध्ये ४०७ गर्भपात झाले होते.

किती आठवड्यांपर्यंत करता येतो गर्भपातगरोदरपणाच्या २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो. गरोदरपणाच्या २० ते २४ आठवड्यांदरम्यान गर्भात काही व्यंगांचे निदान झाले तर गर्भपातासाठी पूर्वी न्यायालयात जावे लागत असे. पण, आता डाॅक्टरच गर्भपाताची परवानगी देऊ शकतात.

दोष, व्यंग असल्याने सर्वाधिक गर्भपातवैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून गर्भपात करण्यात येतात. गर्भातील बाळात दोष, व्यंग असल्याने गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात घाटी रुग्णालयात ४९० गर्भपात झाले. यात २० ते २४ आठवड्यांतील ८१ गर्भपात झाले.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाप्रमुख, घाटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPregnancyप्रेग्नंसी