लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : वाहन चालवत असताना कधी पाठीमागून ॲम्बुलन्स किंवा सायरनच्या हॉर्नचा आवाज येतो आणि सर्व वाहने त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग रिकामा करून देतात... मात्र, कधी असेही होते की, पाठीमागून सायरनचा हॉर्न वाजतो तुम्ही बाजूला सरकता आणि एक दुचाकीस्वार युवक धूम स्टाइल कट मारून पुढे निघून जातो... सायरन असो वा ॲम्बुलन्सचा हॉर्न, असे हॉर्न कोणालाही बसविता येत नाही. त्याचेही नियम आहेत. मात्र, आजघडीला बाजारात अवघ्या २०० ते ४०० रुपयांत हे हॉर्न सहज मिळतात.
कोणालाही विकले जातात हॉर्न अधिकृत ऑटोमोबाइलच्या शोरूममध्येच असे हॉर्न विकणे अपेक्षित आहे. ज्यांनी हे हॉर्न नेले; त्यांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ताही विक्रेत्याने रजिस्टरवर लिहिणे अपेक्षित आहे, पण गल्लीबोळातील दुकानात असे हॉर्न सहज मिळतात. त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.
लहान मुलांचे रडणे ते डुकराचे ओरडणेnलहान मुलाच्या रडण्याचा आवाज, डुकराच्या आवाजाचे हॉर्नही उपलब्ध आहेत. टवाळखोर तरुणांनी असे हॉर्न दुचाकीला बसविले आहेत.nअचानक असे आवाज ऐकल्यावर समोरील वाहनधारक दचकल्याने अपघातही होतात.
कुठून येतात फॅन्सी हॉर्न? nचीनमधून हे हॉर्न येत असून ते चायनीज हॉर्न (फॅन्सी हॉर्न) म्हणून ओळखले जातात.nदुचाकीला लावण्यासाठी लहान आकारात हे हॉर्न उपलब्ध आहेत.
वाहनांमध्ये कंपनीच्या व्यतिरिक्त बदल करणे बेकायदा आहे. कार असो वा दुचाकीला उत्पादक कंपनीने जो हॉर्न दिलेला आहे, तो काढून कर्कश हॉर्न बसविणे ही गंभीर बाब आहे. ६०० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. - अशोक थोरात, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक विभाग