शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवसेनेत काहीतरी चाललंय ! अतिवृष्टीच्या पाहणीआडून राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे लोकसभा व्हिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 12:33 PM

Abdul Sattar News : इंजिनिअरिंगचे गणित जुळवून राज्यमंत्री स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दावा करण्याच्या तयारी असल्याची चर्चा

ठळक मुद्देअतिवृष्टीनंतर शहरी आणि ग्रामीण भागात पाहणी दौरा शहरात एमआयएमचे वर्चस्व वाढले आहे.सत्तारकार्ड वापरण्याचा विचार शिवसेनेचे वरिष्ठ करीत असल्याची चर्चा

औरंगाबाद : सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेच्या ( Shiv Sena ) तिकिटावर विधानसभेत गेलेले महसूल राज्यमंत्री आ. अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान पाहणी आडून आगामी लोकसभा निवडणुकीचे ( Aurangabad Loksabha ) व्हिजन तर हाती घेतले नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. ( Something is going on in Shiv Sena ! Minister of State Abdul Sattar's Lok Sabha Vision) 

गंगापूर, कन्नड, खुलताबाद, औरंगाबादमधील जुन्या व नव्या शहरात राज्यमंत्री सत्तार यांनी पायात भिंगरी बांधल्याप्रमाणे पाहणी करीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे नुकसानग्रस्त भागाचे पाहणीसत्र सध्याही सुरू आहे. परंतु, या सगळ्यांमागे आगामी लोकसभा निवडणुकीची गणिते दडल्याची चर्चा रंगली आहे. राज्यमंत्र्यांनी शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जाऊन नुकसानीसंदर्भात चर्चा केली. यात पूर्व मतदारसंघ विधानसभा संघटक राजू वैद्य यांच्या निवासस्थानी जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे आदी पदाधिकाऱ्यांसह राज्यमंत्री सत्तार यांचे झालेले चहापान शिवसेनेतील अंतर्गत वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. सिल्लोड मतदारसंघातून राज्यमंत्री सत्तार यांचे चिरंजीव विधानसभा निवडणुकीला सामोरे जातील असे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांना मतदारसंघाची शोधाशोध करण्याची वेळ येऊ शकते. शिवसेनेत सत्तार यांचा चांगलाच जम बसला आहे. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचे गणित जुळवून राज्यमंत्री स्वत:साठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचा किंवा लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दावा करण्याच्या तयारी असल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.

महापालिकेच्या अनुषंगाने आणले असेल समोर?गेल्या लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभव करीत लोकसभेत प्रवेश मिळविला. त्यामुळे शहरात एमआयएमचे वर्चस्व वाढले आहे. त्याला ब्रेक लावण्यासाठी सत्तारकार्ड वापरण्याचा विचार शिवसेनेचे वरिष्ठ करीत असतील. त्यामुळेच मुस्लिमबहुल भागात सत्तार यांनी प्रथम पाहणी करीत नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यामागे महापालिका निवडणुकीसाठी सत्तार यांना समोर करण्याची खेळीदेखील पक्षश्रेष्ठींच्या मनात असू शकते, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAbdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनRainपाऊस