शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

'सून-मुलगा त्रास देतात';‘एल्डर लाईन’ हेल्पलाईन अचानक बंद, ज्येष्ठांना तक्रारीसाठी जागाच नाही

By स. सो. खंडाळकर | Published: August 01, 2023 11:45 AM

तक्रारी ऐकून घेतल्या जातात, पण तक्रारींचा निपटारा करण्याचे प्रयत्न थांबले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : घरगुती समस्यांसह ज्येष्ठांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने ‘एल्डर लाईन’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली, पण १ जुलै २०२३ पासून या एल्डर लाईनचे काम अचानकपणे बंद झाले आहे. याची गरज नाही, असे सांगून फिल्डवरचे काम थांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठांसाठी १४५६७ हेल्पलाईन१ ऑक्टोबर २०२१ पासून ज्येष्ठांसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या हा नंबर सुरू आहे. तक्रारी ऐकून घेतल्या जातात, पण तक्रारींचा निपटारा करण्याचे प्रयत्न थांबले आहेत.

माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधारसून छळते, मुलगा टोमणे मारतो; पोटभर खायलाही देत नाहीत, या तक्रारी आता वाढल्या आहेत. अशावेळी या हेल्पलाईनकडून मदत व्हायची. माहिती दिली जायची, मार्गदर्शनही मिळायचे व भावनिक आधारही दिला जायचा.

सहा महिन्यांत १८० तक्रारीदररोज एक तरी तक्रार १४५६७ या हेल्पलाईनवर हमखास यायची. या हिशेबाने सहा महिन्यांत १८० तक्रारी आल्या.

बहुतेक तक्रारींचा निपटाराया हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याकडे कल असल्याने बहुतांश तक्रारींचा निपटारा होत असे. यात पोलिसांचीही मदत घेतली जायची. रेस्क्यू करणे, वृद्धाश्रमात नेणे ही कामे होत होती. तक्रारीनंतर घरातल्या घरात अशी प्रकरणे मिटून जात होती.

जिल्हा क्षेत्रीय अधिकारीही हतबलसध्या तरी फिल्डवरची कामे थांबवण्यात आली आहेत. ती सुरू व्हायला किती वेळ लागेल, सांगता येत नाही. वस्तुत: ज्येष्ठ नागरिकांसमोरच्या समस्या वाढत असताना या हेल्पलाईनची नितांत गरज होती. ती अचानक बंद झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत.- स्वप्निल बारहाते, क्षेत्रीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSenior Citizenज्येष्ठ नागरिक