शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल

By विजय सरवदे | Published: June 26, 2024 7:49 PM

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉल

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण, अलीकडे म्हातारे आईवडील मुलांना ओझे वाटू लागले असून, मुलगा-सून सांभाळत नाहीत. त्यामुळे उतारवयात त्यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा चालविली जाते.

हाडाची काडे करून ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवले, नोकरीला लावले. काहीजणांना उद्योग-व्यवसायासाठीही मदत केली. पण, तीच मुले मोठी झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घरातून हाकलून देत असल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. शहर व ग्रामीण परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिकांना घरगुती समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा संकटसमयी त्यांना मदतीची गरज असते. पण, कोणीही त्यांना मदतीचा हात देण्यासाठी धजावत नाही. दुसरीकडे स्वत:च्या मुलांविषयी तक्रार करण्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक धजावत नसून आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करतात. पण, काहीजण मात्र आपल्या होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईनज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक संस्था, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनने १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे.

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा कॉलपीडित ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या १४५६७ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कॉल करता येईल. त्यांना तत्काळ मदत मिळेल. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनची सेवा तत्पर आहे.

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉलया हेल्पलाईनवर कुटुंबाकडून होत असलेला छळाची तक्रार, संपत्तीचा वाद, वृद्धाश्रम, कायदेविषयक सल्ला यांसह विविध समस्यांसाठी ज्येष्ठ नागरिक या हेल्पलाइनवर कॉल करून मदतीची अपेक्षा करू शकतात.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी