खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या वेळी बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या बियाणे उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना मुबलक, उगवणक्षम आणि उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने रबी व उन्हाळी सोयाबीन पेरणीचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. कृषी विभागाच्या या आवाहानास प्रतिसाद देत कायगाव परिसरातील भेंडाळा, भिवधानोरा, पखोरा, अगरवाडगाव आणि गळनिंब शिवारात सुमारे २२ एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. हे सोयाबीन सध्या वाढीच्या अवस्थेत असून पिकाची योग्य वाढ दिसून येत आहे. यावेळी भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. याप्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहायक श्यामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.
गतवर्षी झाले होते एकरी ७-८ क्विंटल उत्पादन
शेतकऱ्यांना मागील उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीतून एकरी ७-८ क्विंटल एवढे उत्पादन मिळाले होते. किमान हमी भावाची खात्री असल्याने अजूनही काही शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल दिसून येत आहे. यामुळे उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फोटो :
भेंडाळा शिवारात पेरणी झालेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची जिल्हा अधीक्षक तथा कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी हजर होते.
120221\tarekh ahemad usuf shaikh_img-20210209-wa0017_1.jpg
भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतक-यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणी केली. या प्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहाय्यक शामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.