शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

साडेतीन लाख हेक्टरवर होणार पेरणी

By admin | Published: July 16, 2014 11:55 PM

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली.

हिंगोली : चातकाचा संकेतही सुरूवातीला खोटे ठरल्याने वरूण राज्याच्या आगमनासाठी रोजे, उपवास, विधी, पूजापाठ, प्रार्थना करावी लागली. सर्वांनीच पावसासाठी धावा सुरू केल्याने मृग नक्षत्राच्या दीड महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस दाखल झाला. सध्या हलका का होईना पाऊस मागील तीन दिवसांपासून हजेरी लावित असल्याने पेरते व्हा... पेरते व्हा... असा चातकाचा मधुर आवाज कानी पडू लागल्याने शेतकरी जोमाने पेरणीला लागला आहे; परंतु यंदा पेरणीला बराच उशिर झाल्याने पिके घेण्याच्या बाबतीत शेतकरी संभ्रमात आहेत. मागील वर्षी १२ जून रोजी आलेल्या मान्सून मध्ये सातत्य होते. पावसामुळे गतवर्षी अवघ्या १० दिवसांत पेरण्या आटोपल्या होत्या. यंदा उशिरा पाऊस दाखल झाल्याने पेरण्या लांबल्या. मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शिवाय पुनर्वसू नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती उद्भवली होती. यंदा पेरणी होईल की नाही, या चिंतेत शेतकरी होता. पुढील आठवड्यात सुरूवात होणाऱ्या अश्लेषा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी वरूणराजाने उत्पादकांची हाक ऐकल्याने मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.प्रामुख्याने औंढा नागनाथ तालुक्यात ३० मिमी पाऊस सर्वाधिक होता. उर्वरित तालुक्यात सरासरी १० मिमीच्या खालीच पाऊस होता. १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिले. १५ जुलै रोजी देखील सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती. १६ जुलै रोजी देखील समाधानकारक पाऊस झाला नसला तरी पडती भावना निर्माण झाली आहे. आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा २ लाख ३५५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असल्याने एकूण पेरणीचा कालावधी वाढणार आहे. त्यापाठोपाठ ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाणार आहे. ,तद्नंतर तूर २७ आणि ज्वारी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे; परंतु १५ जुलैैनंतर मूग आणि उडीद पिकाची पेरणी न करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. दोन्ही पिकांच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात शेतकरी आहेत; परंतु अधिक रिस्क न घेता शेतकऱ्यांनी हळद लागवड सुरू केली असून घरचे बियाणे असलेले पीक पेरीत आहेत. आपत्कालीन पीक नियोजन असे १५ जुन ते ७ जुलैपर्यंत खरीप हंगामातील सर्व पिके घेता येत होती; पण पावसाने ओढ दिल्याने उत्पादकांनी पिके घेण्याबाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण ८ ते १५ जुलैैपर्यंत मुग आणि उडीदाची पेरणी होणे आवश्यक असते. आता या पिकाचा कालावधी निघून गेल्याने उत्पादक कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सुर्यफुल आदी पिके घेवू शकतात. यापुढे देखील पाऊस लांबल्यास पेरणी करताना आंतरपिके अधिक घ्यावीत. त्यात १६ ते ३१ जुलैै- बाजरी, सुर्यफुल, तूर+सोयाबीन (+ आंतरपीक), बाजरी +तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. १ ते १५ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+तीळ+बाजरी, एरंडी+धने, एरंडी+तूर. १६ ते ३१ आॅगस्ट- बाजरी, सुर्यफुल, तूर, एरंडी+धने, एरंडी+तूर. सोयाबीनची पेरणी सर्वाधिक मागील वर्षी १२ जुन रोजी आलेल्या मान्सून पावसात पुढे सातत्य राहिल्यामुळे अवघ्या १० दिवसांत आटोपल्या होत्या खरीप हंगामाच्या पेरण्या. यंदा मृग, आर्द्रा नक्षत्र पुर्णत: कोरडे गेल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते आभाळाकडे. पुढील अश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या होत्या; पण त्यापूर्वी ऐकली वरूण राजाने हाक. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत असून १३ जुलैै रोजी १२.६२ मिमी झालेला होता सर्व तालुक्यांत पाऊस . १४ जुलैै रोजी झालेला ३.७९ मिमी पाऊस कमी असला तरी मान्सूनमध्ये सातत्य राहिल्याने १५ जुलै रोजी पावसाची रिमझिम असताना झाला २.२ मिमी पाऊस.जिल्ह्यात अजून कोठेही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी आता पेरणीसाठी अधिक विलंब नुकसानकारक ठरणार असल्याने आहे त्या ओलीवर शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरूवात.१५ जुलैैनंतर मूग व उडीद पिकाच्या पेरणीचा कालावधी निघून गेल्याने अनुक्रमे १३ आणि १० हजार हेक्टर क्षेत्रावर कोणते पीक घ्यावे, या विचारात आहेत शेतकरी. जिल्ह्यात झालेला पाऊस (मिमी)तालुके गतवर्षी यंदा १३ जुलै १४ जुलैहिंगोली ४२७.८७ ५२.८७ ९.७१ ०.७१कळमनुरी ३४८.८८ ४०.४२ ६.१७ ४.०५सेनगाव ३६२.२६ ५८.८३ ८.५० ०.६७वसमत ३८१.७५ ५५.८६ ८.७१ ८.२९औंढा ना. ४६२.८७ ९३.२५ ३०.० ५.२५एकूण ३९७.१३ ६०.६१ १२.६२ ३.७९