सोयगाव : कोरोना संसर्गानंतर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी ग्रामीण भागाच्या रस्त्यावर धावू लागली आहे. त्यासाठी प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र तालुक्याचे वर्दळीचे गाव असलेल्या जरंडी बसस्थानकावर मात्र सोयगाव आगाराच्या बसेस येत नसून गावाबाहेरूनच बस जात असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे. त्यामुळे बसेस सुरू आहे की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे, तर दुसरीकडे सोयगाव आगारातील बसला जरंडी बसस्थानकाचे वावडे असल्याचे समोर आले आहे.
-------
ग्रामपंचायतीकडून तक्रार
सोयगाव आगाराच्या बस जरंडी गावातून येत नसल्याने आगाराला ग्रामपंचायतीच्या वतीने लेखीपत्र देण्यात येऊन जाब विचारला जाणार आहे, अशी माहिती उपसरपंच संजय पाटील यांनी दिली, तर दुसरीकडे मात्र संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवसात बसेस गावातून न आल्यास गावाबाहेरील रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.