या बैठकीला तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे, शेख मकसूद आदींची उपस्थिती होती. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख राजेंद्र राठोड व तालुकाप्रमुख प्रभाकर काळे उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताची टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी, खत किंवा बियाणे चढ्या भावाने विक्री होत असेल तर त्यावर कारवाई करावी, शेतकऱ्यांना ‘विकेल ते पिकेल’ या योजनेची माहिती देऊन याबाबत कृषी विभागाने जागृती करावी, शेतकऱ्यांना बांधावर खत तसेच गावातच बियाणे उपलब्ध करून देता येईल, यासाठी तसेच शेतकऱ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने खते व बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रासमोर गर्दी होणार नाही याचे नियोजन करण्याच्या सूचना सत्तार यांनी यावेळी दिल्या.
190521\img-20210519-wa0067.jpg
सोयगाव येथील बैठकीत मार्गदर्शन करतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार