कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्राथमिक शाळांसाठी असलेल्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा बोजवारा उडाला होता. जिल्हा परिषदेला निधीच उपलब्ध नसल्याने प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी रेंगाळली होती. अखेरीस जिल्हा परिषदेने पाठ्यपुस्तकांची खरेदी केल्याने सोयगावसाठी मराठी माध्यमासाठी पहिली ते आठवीसाठी विविध विषयांसाठी ४३ हजार ८५५ तर उर्दू माध्यमासाठी ४ हजार आठशे ६० पुस्तकांचा पहिल्या टप्प्यात पुरवठा केला आहे. पहिली ते आठवीसाठी केंद्रनिहाय पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांनी सांगितले. सुरुवातीला निधी नसल्याने जुन्याच पुस्तकांची पुनर्वापर योजना आखण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांकडून पुस्तके संकलित करून मागील इयत्तेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत. जुनी पुस्तके मिळालेल्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वितरण होणार नसल्याची माहिती हाती आली आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या इयत्ता चौथीची पुस्तके उपलब्ध झाली नसल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
छायाचित्र ओळ : परिवहनच्या महाकार्गो बसने सोयगावला पाठ्यपुस्तक दाखल.
230721\img_20210723_143912.jpg~230721\img_20210723_143813.jpg~230721\img_20210723_140613.jpg
सोयगाव-सोयगाव पंचायत समिती ला परिवहनच्या महाकार्गो बस ने पुस्तके पुरवठा~सोयगाव-सोयगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तकांचा खच~सोयगाव-सोयगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पुस्तके