सोयगाव तहसील कार्यालय उपक्रमाप्रमाणेच सुंदर झाले आहे.
सोयगाव तहसील कार्यालयाचा विविध विभाग सुंदर माझे कार्यालय योजनेत अपडेट झालेले असून, तहसीलदार प्रवीण पांडे व नव्याने नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. माधुरी तिखे यांच्या कल्पकतेतून सोयगाव तहसील कार्यालयाचा कायापालट झालेला आहे. कार्यालय केवळ सुंदरच नव्हे तर या कार्यालयाची कार्यप्रणालीसुद्धा गतिमान झालेली असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी सांगितले. कार्यालयाच्या विविध विभागांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेटी देऊन पाहणी केली व उपविभागात सोयगाव तहसील अव्वल असल्याचे सांगितले. यावेळी माझे कार्यालय सुंदर कार्यालय या भित्तीपत्राचे विमोचन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, धरमसिंग चव्हाण आदींची उपस्थिती होती.
छायाचित्र ओळ : राज्यमंत्री अब्दुल सत्तार सोयगाव तहसीलच्या विविध विभागांची पाहणी करतांना.