लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याचा प्रश्न आता हळूहळू आंतरराष्टÑीय पातळीवर जात आहे. कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी सर्वात प्रथम मुंबई येथील एका कंपनीने स्वारस्य दाखविले. त्यापाठोपाठ चायना येथील एका खाजगी कंपनीचे पथक शहरात दाखल झाले. या पथकानेही आमची कंपनी शहरात काम करण्यास तयार असल्याचे सांगितले. सोमवारी स्पेन येथील एका कंपनीचे अधिकारी शहरात आले. त्यांनी मनपा आयुक्तांची थेट घेऊन १५ दिवसांमध्ये कच-यावर प्रक्रिया करणारे डीपीआर सादर करण्याचे आश्वासन दिले.नारेगाव कचरा डेपोजवळील शेतक-यांनी पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केले. शहरातील एकही कच-याचा ट्रक डेपोवर जाऊ देण्यात आला नाही. अवघ्या तीन दिवसांमध्ये महापालिका मोठ्या संकटात सापडली होती. शेतक-यांनी महापालिकेला अवघ्या ९० दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. तीन महिन्यांमध्ये नारेगाव येथील कच-यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा, नवीन एकही ट्रक डेपोवर येऊ नये अशी भूमिका शेतक-यांची आहे. मागील काही दिवसांपासून मनपा कच-यासाठी पर्यायी जागा शोधत आहे. शहराच्या कोणत्याच भागात मनपाला जागा मिळायला तयार नाही. जिथे जागा आहे, तेथे नागरिकांचा प्रखर विरोध होतोय. आतापर्यंत दोन कंपन्यांनी मनपाकडे पॉवर पॉइंट पे्रझेंटेशन सादर केले आहे. मनपाने अद्याप कोणत्याही कंपनीला हिरवा कंदिल दाखविला नाही.
शहराच्या कच-यात चीननंतर स्पेनला रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:17 AM