शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

सभापती, बीडीओंमध्ये शाब्दिक ‘वॉर’

By admin | Published: January 02, 2015 12:35 AM

कळंब : शहरात एकीकडे एकमेकांवर नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना पंचायत समितीच्या कार्यालयात मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास शाब्दीक ‘वॉर’ झाला़

कळंब : शहरात एकीकडे एकमेकांवर नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना पंचायत समितीच्या कार्यालयात मात्र पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास शाब्दीक ‘वॉर’ झाला़ काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला असला तरी अनेकांनी दिवसभर ‘हॅप्पी न्यू इअर’ म्हणत हा विषय चर्चेचा बनविला होता़कळंब पंचायतसमितीत साहित्य खरेदीवरून सभापती छायाताई वाघमारे व काही सदस्यांमध्ये २४ डिसेंबर रोजी चांगलीच शाब्दीक चकमक झाली होती़ त्यानंतर सभापती वाघमारे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले होते़ मात्र, काही पंचायत समिती सदस्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता़ या घटनेला आठ दिवस लोटतात न लोटतात तोच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी सभापती छायाताई वाघमारे व प्रभारी बीडीओ विजय देशमुख या दोघांमध्ये कार्यालयातच शाब्दीक चकमक उडाली़ वाघमारे यांनी ‘कार्यालयाच्या कामकाजावेळी आपल्याला विचारल्याशिवाय एकाही फाईलीवर सही करू नका’, असे फर्मान सोडले होते़ यावर बीडीओंनी हे शक्य नसल्याचे सांगितल्याने पदाधिकारी अधिकाऱ्यांमध्ये २० ते २५ मिनिटे पंचायत समिती कार्यालयात वाद सुरू होता़ तर ग्रामीण भागातून विविध कामासाठी आलेल्या ग्रामस्थांची तारंबळ उडाली होती़ वाद वाढलेला पाहून काही पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मध्यस्थी करून वाद थांबविला़ तसेच वाद चर्चेने सोडविण्याचा सल्लाही दिला़