लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमत सखी सन्मान सोहळ्यात सखी मंच सदस्यांसाठी खास पारंपरिक पैठणी फॅशन-शोचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात ७ नोव्हेंबर रोजी हा सोहळा होत आहे.अनेक क्षेत्रात आज महिला पुरूषांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. त्यातही उल्लेखनीय कार्य करून अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. बौद्धिक बळावर यशोशिखर गाठणा-या महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत सखी गौरव’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाात सदैव अग्रेसर असलेल्या लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे जालना शहरातील ध्येय वेड्या व सेवाव्रती महिलांचे कार्य जगासमोर आणण्यासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याकरिता ‘लोकमत सखी गौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या उपक्रमाची सुरूवात २०११ मध्ये नागपूर येथून करण्यात आली. यंदाचे पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. एका बाजूला संसार आणि दुस-या बाजूला नोकरी किंवा व्यवसाय अशी तारेवरची कसरत करीत यशोशिखर गाठणा-या अनेक महिला समाजात आहेत. वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, व्यावसायिक, औद्योगिक, शौर्य आणि क्रीडा इ. क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या सखींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा गौरव पुरस्कार सखी मंचच्या सदस्यांपुरताच मर्यादित नाही. अन्य महिलाही यात सहभाग नोंदवू शकतात.
लोकमत सखी सन्मान सोहळ्यात रंगणार खास पैठणी फॅशन-शो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 12:50 AM